भोकर तालुक्यातील मजुरांच्या हाताला काम नसल्याने पर प्रांतात स्थलांतर.
आदिवासी भागातील मजुरांची कामासाठी भटकंती
बोरवाडी येथील100हून अधिक कुटुंबाचे तेलंगणात स्थलांतर
भोकर (बी. आर. पांचाळ)
मागेल त्याच्या हाताला काम देणे हा शासनाने मजुरांसाठी कायदा केलेला आहे गावातील मजुरांना काम उपलब्ध नसेल तर त्यांनी मागणी केल्यानंतर त्या मजुरांना काम उपलब्ध करून दिले पाहिजे असा शासनाचा नियम आहे त्यासाठीच महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना शासनाने सुरू केली मात्र प्रत्यक्ष मजुरांच्या हाताला मात्र काम मिळत नाही खरिपाचा हंगाम संपत आला आहे शेतातील कामे जवळपास आटोपलेली आहेत मजुरांना काम नसल्याने पोटाची खळगी कशी भरायची हा प्रश्न समोर उभा राहतो कामासाठी भोकर तालुक्यातील मजुरांचे परप्रांतात स्थलांतर होत असून शासनाचा एवढा मोठा गाजावाजा रोजगार हमी योजनेचा असला तरी मजुरांना मात्र काम नसल्याने अनेक गावांतून मजूर कामासाठी परप्रांतात जात आहेत
शासनाने महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना ही मजुरांसाठी काढलेली असून गावातील मजुरांना काम उपलब्ध व्हावे यासाठी विविध योजनेची कामे केली जातात काही कामे रोजगार हमी योजनेअंतर्गत असले तरी ती गुत्तेदारी पद्धतीने दिली जातात प्रत्यक्ष मजूर मात्र तिथे नसतात यंत्राच्या साह्याने कामे करून मस्टर मजुरांच्या नावाने भरतात प्रत्यक्ष त्या मजुरांना मात्र काम नाही चालू वर्षाच्या खरीप हंगामाने शेतकऱ्यांना साथ दिली नाही 50% हुन कमी उत्पादन शेतीचे झाले कापूस सोयाबीन उडीद मूग ज्वारी हाती लागलीच नाही बाजारात भाव देखील नाही त्यामुळे शेतकरी आर्थिक डबघायीस आलेला आहे शेतामध्ये झालेला खर्च देखील निघत नाही तालुक्यात मजुरांच्या हाताला काम नसल्याने कुठली उपाययोजना शासनाकडून अद्याप करण्यात आलेली नाही, काही योजनांमध्ये रोजगार हमी योजनेचे नाव दिले जाते मात्र मजूर दुस रेच असतात काम वेगळेच असते सर्व योजनांचे अधिकारी या कामाकडे दुर्लक्ष करतात गाव पातळीवर देखील अशी कामे मजूर कागदावर दाखवून केली जातात
कामासाठी मजुरांचे स्थलांतर
भोकर तालुक्यात मजुरांची संख्या 25 हजाराहून अधिक आहे मात्र सद्यस्थितीत किती मजूर काम करतात हे शासनाच्या अधिकाऱ्यांनाच माहीत मागेल त्याला काम देण्याचा नियम असताना देखील मजुरांच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष केल्या जाते गावामध्ये कामे नसल्याने मजूर वर्ग उपासमारीची वेळ आली आहे स्थानिक पातळीवर गावात कामे नाहीत इतरत्र सुद्धा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर कुठल्या काम दिसत नाही म्हणून गावातील मजूर वर्ग परप्रांतात कामासाठी जात आहेत अनेक कुटुंबाचे स्थलांतर झाले आहे
बोरवाडीचे शंभर कुटुंब कामासाठी तेलंगणात स्थलांतर तालुक्यातील बोरवाडीतील बहुतांश अल्पभुधारक शेतकरी व मजुर आहेत आज घडीस मजुरांच्या हाताला काम नसल्याने शंभरहून अधिक कुटुंबांचे स्थलांतर लगतच्या तेलंगणात झाले आहे.
बोरवाडी हे अतिदुर्गम जवळपास तीनशे कुटुंबाचे गाव असून सर्वच्या सर्व अल्पभूधारक आणि मजूर असलेल्या या गावात शेतीव्यतिरिक्त रोजगाराचे एकही साधन नाही. आधीच शेती कमी, तीही कोरडवाहू भयान अवस्थेत सापडलेल्या कुटुंबानी जगायचं तरी कसं ? कुटुंबाचा गाडा हाकायचा तरी कसा ? अशा विवंचनेत असलेल्या कुटुंबांना काम मिळेल तिथे स्थलांतर करण्याशिवाय दुसरा पर्याय नसल्याने बोरवाडीतील अनेक कुटुंबांनी शाळेत शिकत असलेल्या मुलाबाळांसह लगतच्या तेलंगणात स्थलांतर करणेच पसंद केले आहे. आभाळातील पाण्याच्या भरवशावर उरली सूरली शेती करून आता पाण्याअभावी शेती करता येत नसल्याने लगतच्या तेलंगणात कापूस वेचणी असो मिरच्या तोडणी, ज्वारी असो की हळद काढणीसाठी आदिवासींना स्थलांतराशिवाय पर्याय उरत नाही. आदिवासींसाठी असलेल्या किनवट येथील प्रकल्प कार्यालयात असलेल्या योजना येथील गावापर्यंत पोहोचत नसल्याचे चित्र असून विभागाने लक्ष देण्याची गरज निर्माण झालेली आहे.
आता आम्ही जथ्थेच्या जथ्थे कापूस वेचणीसाठी बोरवाडीपासून २५० किमीवर तेलंगणा राज्यातील पोलमपल्ली (जिल्हा मंचेरीयाल) येथे दिवाळीपासून कुटुंबासह आलोत. गावात कोणतेच काम नसल्याने आम्ही दरवर्षी सहा महिन्यासाठी इकडे कामाला येतो.
——मारोती बोथकर
अल्पभूधारक शेतकरी, बोरवाडी
शेतीही नाही, कामही नाही आणि रोजगार हमीचे गावात कामही नाही, त्यामुळे इकडे दरवर्षी दिवाळीपासून उन्हाळ्यापर्यंत कामाला यावे लागते. आम्हाला आता तेलंगणातच बरे वाटते.
——सुशीलाबाई झाडे, बोरवाडी
ग्रामपंचायतीने विकासाचा आराखडा तयार करून त्याची अंमलबजावणी करणे गरजेचे असते पण गावातील मनमानी कारभारामुळे विकास होत नाही मजुरांच्या समस्या कडे दुर्लक्ष केल्या जाते ज्या कामांमध्ये फायदा मिळतो ती कमी मात्र उरकली जातात
——भागेरथीबाई वानोळे
ग्रामपंचायत सदस्या, बोरवाडी