भोकर तालुक्यात रेती तस्करी वर महसूल विभागाचा आशिर्वाद….?
![](http://adiwasikrantimarathinews.com/wp-content/uploads/2025/01/20250121_165219-1024x576.jpg)
भोकर:भोकर तालुक्यात रेती माफिया वर तहसीलदार साहेबाचा आशिर्वाद दिसते.कारण भोकर शहरात संध्याकाळी रात्रभर अवैध रेती वाहतूक भरवैगाने सुरू आहे.
नांदेड जिल्ह्यातील सर्वांची नजर गोदवरी नदी काठावर असून दररोज रात्री व पहाटेपर्यंत अवैध रेती तस्करी ट्रॅक्टर व टिप्पर द्वारे भोकर शहरात होत असून संबंधित अधिकारी बघायची भूमिका निभवतात.याला कारण म्हणजे आर्थिक देवाणघेवाण तर होत नाही ना असा प्रश्न भोकर येथील नागरिक करीत आहेत.
रेती तस्करी करण्यासाठी सर्व शासकीय नियम पायदळी तुडवत दररोज दिवस रात्र उपसा करून भोकर शहरात अवैध रेती वाहतूक भरवैगाने सुरू आहे.त्यामुळे महसूल व पोलीस यंत्रणा हतबल झाली आहे. शासनाचा करोडो रुपयांच्या महसूल बुडत असल्याचे जनतेत बोलले जात आहे. रेतीही दर्जेदार व सर्वांची नजर गोदवरी नदी काठावर असून दररोज रात्री व पहाटेपर्यंत अवैध रेती तस्करी ट्रॅक्टर व टिप्पर द्वारे होत असून संबंधित अधिकारी बघायची भूमिका निभवतात. याला कारण म्हणजे आर्थिक देवाणघेवाण तर होत नाही ना असा प्रश्न भोकर शहरांतील नागरिक करीत आहेत.
रेती तस्करी करण्यासाठी सर्व शासकीय नियम पायदळी तुडवत दररोज दिवस रात्र उपसा करीत आहेत. त्यामुळे महसूल व पोलीस यंत्रणा हतबल झाली आहे. शासनाचा करोडो रुपयांच्या महसूल बुडत असल्याचे जनतेत बोलले जात आहे. या सह तालुक्यात मोठे बांधकाम सुरू आहेत. त्यामुळे अमर्यादपणे रेतीचा अवैधपणे उपसा होत आहे.या व्यवसायात अत्याधुनिक यंत्राचा वापर रेती तस्करांकडून केला जात असून, यात जेसीबी व ट्रॅक्टरच्याही मदतीने नदीपात्रातील रेतीच्या उपसा करून मोठ-मोठ्या टिप्पर व ट्रॅक्टर द्वारे शहराकडे व ग्रामीण भागात पाठविली जात आहेत.रेतीचा मोठ्या प्रमाणात उपसा होत आहे.नदीपात्रात वाहने उभे करून त्यात रेती भरून गुप्त मार्गाने गावांमधून काढले जातात.त्यामुळे नागरिकांची मोठ्या आवाजाने झोपमोड होत असून रस्त्याची वाट लागली आहे. त्यामुळे रेती तस्करावर महसूल व पोलीस विभागाचे वतीने कार्यवाही का होत नाहीअसे भोकर शहरातील नागरिकांचे मत आहे.या अवैध रेती तस्करी भोकर शहर तालुक्यात ग्रामीण भागात होत असुन याकडे वरिष्ठ अधिकारी लक्ष दिले पाहिजे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे