बडतर्फ जवानांच्या आमरण उपोषणाला आदिवासी विकास संघातर्फे पाठिंबा-प्रा.मोतीलाल सोनवणे..

धुळे जिल्हाधिकारी कार्यालय समोर देशाचे अन्याग्रस्त जवानांना न्याय मिळावा म्हणून मंगळवार दिनांक २१/१/२०२५ पासून अन्नत्याग उपोषणाला बसले आहेत.त्यावेळी त्यांना आदिवासी विकास संघातर्फे पाठिंबा देण्यात आला.भारत देशाच्या रक्षणासाठी लढणाऱ्या जवानांना चुकीची शिक्षा नोकरीवरून काढून घरी पाठवण्यात आले.
बडतर्फ केलेल्या जवानांच्या प्रमुख मागण्या अशा आहेत की,जवानांना चुकीच्या पद्धतीने सेवेतून बडतर्फ करू नये यासाठी ऑडिओ, व्हिडिओ,रेकॉर्डिंग व्हावी. सेवेतून बडतर्फ केल्या जवानांना पेन्शन मिळावी त्यांनी जोपर्यंत नोकरी केली त्यांचा मोबदला त्यांना मिळावा. बडतर्फ केल्याने पोलीस तपासणी मध्ये बडतर्फ येत असल्याने त्यांना कोठे नोकरी मिळत नाही त्यामुळे भारतीय संविधानातील आर्टिकल १६ प्रमाणे त्यांना काम करण्याचा अधिकार आहे. त्यासाठी आर्टिकल २१ प्रमाणे राज्य सरकारने बडतर्फ जवानांचा आदर सन्मान देऊन शासकीय सेवेत घ्यावे व त्यांना एक्स सर्विस मॅन चा दर्जा देण्यात यावा.देशातील बडतर्फ करणाऱ्या जवानांची राज्य व केंद्र सरकारने आकडेवारी जाहीर करावी.
आदिवासी विकास संघाचे संस्थापक अध्यक्ष प्रा.मोतीलाल सोनवणे, धुळे जिल्हा संपर्कप्रमुख साहेबराव वाकडे,आंदोलन प्रमुख आप्पासाहेब नामदेव येळवे, धुळे तालुका अध्यक्ष दिलीप शिरसाठ,दिलीप बागुल यांनी बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. त्यावेळी अन्यायग्रस्त जवान चंदू चव्हाण, संदीप धांडे, धनराज गोतमारे, अनंता बोधक, समाधान कदम, नामदेव पाटील, ज्ञानेश्वर तायडे, गजानन सपकाळे, प्रभाकर बाविस्कर, भाऊराव बनसोडे, योगेश कुटे, शिवप्रसाद पाटील इ. मान्यवर उपस्थित होते.