महसुल प्रशासनाच्या आर्शिवादाने रेती माफिया चा उच्चांक उसळला…?

पार्ट 1

भोकर (विजयकुमार मोरे कोळी). नांदेड जिल्ह्यातील कुठल्याही रेती घाटावर सध्या रेतीचे उत्खनन व वाहतुकीला परवानगी नसताना भोकर तालुक्यात रेती मोठ्या प्रमाणावर तस्करी करण्यात येत असून रेती तस्करा च्या पाठीवर राजकीय पाठबळ व मोठे अर्थकारण असल्याने रेती तस्कर कोणालाही न घाबरता रात्रीच्या वेळी बिनधास्तपणे भरधाव वेगातत हाॅयवा ,टिप्पर, या वाहनाच्या माध्यमातून अवैधरित्या रेतीची तस्करी करून लाखोंची माया जमवत आहेत तर शासनाचा मोठ्या प्रमाणावर महसूल बुडत आहे या कडे भोकर महसूल विभाग डोळे झाक करत कुंभकर्णी झोप घेण्याचे सोंग करत असून वरिष्ठ अधिकाऱ्यानी याकडे लक्ष देण्याची नितांत गरज आहे
जिल्हाधिकारी अभिजीत राऊत व पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी नांदेड जिल्ह्यातील सर्व प्रकारचे अवैध धंदे बंद करण्यासाठी आॅपरेशन फ्लॅश आऊट या अंतर्गत विविध प्रकारचे भरारी पथके नेमून वाळू तस्करीसह विविध प्रकारचे अवैध धंद्यावर अंकुश आणण्याच्या सूचना जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालय व पोलीस ठाण्यात देण्यात आल्या होत्या या आदेशाला भोकर महसूल विभागाने केराची टोपली दाखवत भोकर तालुक्यात चालू असलेल्या अवैध रेतीच्या व्यवसायाकडे दुर्लक्ष करून त्यांना पाठबळ देण्याचे काम केले असल्याची चर्चा सर्वत्र होत आहेत.
रेतीच्या अर्थकारणाने भल्याभल्यांना भुरळ घातली आहे. यामधून राजकीय नेत्यांसह प्रशासनातील अधिकारीही सुटले नाहीत, मात्र ‘कॉमन मॅन’ रेतीच्या गगनाला भिडलेल्या दरामुळे त्रस्त आहे. या गोरखधंद्यामध्ये कमी कष्टात अधिक पैसे मिळत असल्याने संघटित गुन्हेगारी टोळ्या कार्यरत होऊन त्यांचे मनोधैर्य उंचावलेले आहे. या संघटीत गुन्ह्यात तस्करांचा सहभाग आणि त्यांचे रेकॉर्ड तपासून त्यांच्याविरुद्ध एनपीडीए आणि मोका कायद्यांतर्गत कारवाई करावी लागणार आहे. तसेच तस्करी करणार्‍या वाहनांची नोंदणी रद्द करण्यासाठीचे प्रस्ताव प्रादेशिक परिवहन विभागाकडे पाठविल्यास रेती तस्करीला आळा बसू शकतो. या तस्करीतून रेती तस्करांनी मोठी अवैध माया जमवली असून काही काळातच त्यांच्याकडे महागड्या अलिशान गाड्या आल्या आहेत. अनेक ठिकाणी त्यांनी मालमत्ताही खरेदी केली आहे. या सर्व प्रकाराची प्रामाणिकपणे चौकशी झाल्यास रेती तस्करी थांबविणे शक्य आहे.

Google Ad