सावली प्रतिष्ठान व संदीप गौड मित्र मंडळानेआत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना दिला मदतीचा हात: साहित्य केले वाटप

भोकर (तालुका प्रतिनिधी) कर्जापाई शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याने संसार उघड्यावर पडलेल्या आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांना सावली प्रतिष्ठान व संदीप भाऊ गौडा मित्र मंडळाच्या वतीने मदतीचा हात म्हणून खा. प्रा. रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते संसार उपयोगी साहित्य साडी व आर्थिक मदत देऊन 26 जानेवारी रोजी गौरव करण्यात आला.भोकर तालुक्यातील शेतकऱ्यांनी कर्जाला कंटाळून व शेती पिकत नसल्याने. 2020 ते 2024 पर्यंत 50 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांचे कुटुंब उघड्यावर पडल्याने त्या कुटुंबाचा आधार हरवला अशा कुटुंबांना मदत करण्यासाठी सावली प्रतिष्ठान व संदीप भाऊ गौड मित्र मंडळाच्या वतीने पुढाकार घेण्यात आला 26 जानेवारी 2025 रोजी भोकर येथे खासदार चषक क्रिकेट स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमात खा.प्रा.रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांना स्वयंपाकासाठी कुकर, साडी चोळी व आर्थिक मदत देण्यात आली यावेळी गोविंद बाबा गौड, पप्पू पाटील कोंडेकर,सावली प्रतिष्ठानचे अध्यक्ष बी.आर.पांचाळ, उपाध्यक्ष बाबुराव पाटील, संदीप भाऊ गौड यांच्यासह मान्यवर उपस्थित होते

Google Ad