डॉ. कैलास कानिंदे रेणापूरकर यांना डी.लीट.पदवी प्रदान

भोकर (प्रतिनिधी) तालुक्यातील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, पत्रकारिता, आंतरराष्ट्रीय स्तरावर संशोधन करणारे डॉ. कैलास गणपतराव कानिंदे रेणापूरकर यांना त्यांच्या आंतरराष्ट्रीय संशोधन कार्याचा आढावा घेऊन युनिव्हर्सिटी ऑफ सेंट्रल अमेरिका ने डी.लीट.पदवी प्रदान करून सन्मानित केले आहे
आंतरराष्ट्रीय स्तरावर वंचित,शोषित,पिडीत घटकावर संशोधन करणारे संशोधन मार्गदर्शक गुरुवर्य प्रा.डॉ. कृष्णा शेंडे ( पीपल्स कॉलेज नांदेड ) यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यामुळे डी.लीट.पदवी डॉ कांनिदे यांना मिळाली आहे. डॉ. एस. राधाकृष्णन टिचर्स वेलफेयर असोशिएशन, इंडिया यांच्या शिफारशीवरून युनिव्हर्सिटी ऑफ सेंट्रल अमेरिका ने डी. लीट.पदवी प्रदान केली आहे या यशाबद्दल खा आशोक चव्हाण, खा रविद्र चव्हाण,आमदार श्रीजया चव्हाण ,माजी आमदार अमर राजुरकर,पत्रकार संघाचे नांदेड जिल्हा अध्यक्ष संतोष पंडागळे, बळीराम पाटील मिशन मांडवी तथा किनवट शिक्षण संस्था किनवट चे संस्थापक अध्यक्ष प्रफूल राठोड, संस्थेचे सचिव संध्याताई राठोड, रेणूकादेवी महाविद्यालय, माहूर चे प्राचार्य डॉ. टी. एम. गुरनुले, सकाळ बातमीदार बाबुराव पाटील,पत्रकार संघाचे कार्यअध्यक्ष बि आर पांचाळ ,संपादक विकास गजभारे, युवा नेता संदीप पाटील गौड,संपादक जयभीम पाटील,सामाजीक कार्यकर्ता शेख युसुफ, डॉ मनोज गिमेकर,संपादक मनोहर जोंधळे, पत्रकार मनोज शिंदे,उत्तम कानिंदे,अनंत भवरे,डॉ सिद्धार्थ जाधव,सुभाष मोरे यांच्या सह पत्रकार,डॉक्टर,वकिल, प्राध्यापक,व्यापारी यांच्या सह नांदेड जिल्हासह तालुक्यात अभिनंदन करून कौतूक होत आहे