राहुल भैय्या दुबाले संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र पोलीस बाॅईज संघटना तथा महाराष्ट्र राज्य शासन गृह विभाग सदस्य यांना विधान परीषदेवर संधी द्यावी – विकास भैय्या शेलार

शेवगाव प्रतिनिधी :पोलीस कुटुंबियांच्या, अधिकाऱ्यांच्या तसेच सामान्य नागरिकांच्या न्याय हक्कासाठी लढण्यासाठी कायम कठीबद्द असणारे लढावू नेतृत्व राहुल दुबाले यांना विधान परिषदेच्या रिक्त जागेवर काम करण्याची संधी महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री तथा गृहमंत्री मा. देवेंद्र फडणवीस साहेबांनी संधी द्यावी.राहुल दुबाले यांनी आपल्या कार्याच्या जोरावर महाराष्ट्र पोलीस बॉइज संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्र भर संघटनेचे जाळे निर्माण केले आहे. कामाचा तगडा अनुभव असणाऱ्या राहुल दुबाले यांना विधान परिषदेवर आमदार म्हणून काम करण्याची संधी द्यावी. अशी मागणी महाराष्ट्र पोलीस बाॅईज संघटना शेवगाव तालुका प्रमुख विकास भैय्या शेलार यांनी केली