छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती ग्रामीण रुग्णालय भोकर येथे साजरी

भोकर :- रयतेचे राजे, थोर कल्याणकारी लोकराजा, आरक्षणाचे जनक, दिन दलितांचे कैवारी, बहूजनांचे उद्धारक, कोल्हापूर नगरीचे महाराजा, सामाजिक विषमता दूर करून बहुजनांना शिक्षण, उद्योग व नोकरीच्या प्रवाहात आणण्यासाठी आयुष्यभर खंबीरपणे उभे राहाणारे ” छत्रपती राजर्षी छत्रपती शाहू महाराज ” यांच्या आज जयंती निमित्त ग्रामीण रुग्णालय भोकर येथे त्यांच्या प्रतिमेस डॉ प्रताप चव्हाण वैद्यकीय अधिक्षक यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले व सामाजिक न्याय दिन साजरा करण्यात आला.
यावेळी ग्रामीण रुग्णालय भोकर येथील दंत शल्य चिकित्सक डॉ मायादेवी नरवाडे, आरोग्य निरिक्षक सत्यजीत टिप्रेसवार, सहाय्यक अधिक्षक संजय देशमुख, लिपिक प्रल्हाद होळगे, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी बालाजी चांडोळकर, मनोज पांचाळ, औषध निर्माण अधिकारी गंगामोहन शिंदे, क्ष किरण वैज्ञानिक अधिकारी रोहिणी भटकर, अधिपरीचारिका साधना भगत, समुपदेशक सुरेश डुम्मलवाड, आरोग्य कर्मचारी योगेश पवार आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.