सेवानिवृत्त मधुकर वाघ यांच्या सत्कार _प्रा.मोतीलाल सोनवणे

अध्यक्ष प्रा.मोतीलाल सोनवणे व न्याहाळोद येथील माजी सरपंच कैलास पाटील, सामाजिक कार्यकर्ते गणेश धोबी, पत्रकार विशाल रायते यांच्या विशेष मार्गदर्शनाने मंगळवार दिनांक ८/७/२०२५ रोजी संध्याकाळी ठीक ६.०० वाजता मधुकर वाघ यांच्या शिरडाने ता.जि.धुळे येथे सत्कार समारंभाच्या कार्यक्रम थाटामाटात संपन्न झाला.
प्रा.मोतीलाल सोनवणे यांनी मनोगत व्यक्त केले की, त्यांचे नाव मधुकर आहे.मधु म्हणजे गोडवा. त्यांच्या नावातच गोडवा आहे. त्यांच्यातला साधेपणा,मदत करण्याची जिद्द,प्रत्येकाला समजून घेण्याची सवय,आदराने बोलणे इत्यादी महत्त्वाचे गुण त्यांच्यात आहेत.त्यांचे तेजस्वी व्यक्तिमत्व आणि त्यांच्यात कर्तृत्व ठाई ठाई भरले आहे.सुसंस्कृत आहेत आणि मीस्वार्थी पणे त्यांनी सहाय्यक फौजदार या पदावर अत्यंत प्रामाणिकपणाने ३२ वर्ष सेवा केली. त्यांना अनेक पुरस्कार देखील प्राप्त झाले आहेत. माजी सरपंच कैलास पाटील बोलले की, उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी,नजरेत नेहमी नवी दिशा असावी.घरट्याचे काय केव्हाही बांधता येईल क्षितिजा पलीकडे झेप घेण्याची मनात मधुकर वाघ साहेबांसारखी जिद्द असावी. त्यांचे भावी आयुष्य सुखात समृद्धीचे जावो असे संदेश दिले.
या कार्यक्रमाला आदिवासी विकास संघाचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.योगेश थोरात, योगेश शिरसाठ,राजेश सोनवणे, पंढरी जोशी,राजेंद्र शिरसाठ, आकाश शिरसाठ,रमण शिरसाठ ,रुपेश शिरसाठ,मनोहर शिरसाठ, मगन चव्हाण,आनंदा चव्हाण, रामकृष्ण शिरसाठ, उमेश शिरसाठ,ज्ञानेश्वर शिरसाठ,महेंद्र महाले,राहुल जाधव,ऋषिकेश जाधव, विशाल पवार इ.मान्यवर उपस्थित होते.