भोकर (प्रतिनिधी)येथील सामाजीक कार्यकर्ते तथा पत्रकार अरुण डोईफोडे यांची भोकर शहर भाजपाच्या अनूसूचित जाती शहराध्यक्ष पदी व तसेच माधव पवार यांची भाजपा शहर सरचिटणीस पदावर निवड करण्यात आली.
भारतीय जनता पार्टी भोकर शहर मंडळ अध्यक्ष विशाल पाटील माने यांनी वरिष्ठांच्या आदेशानूसार शहर कार्यकारीणीचा विस्तार करुन विविध आघाड्यांच्या नियूक्ती केल्या आहेत अरुण डोईफोडे यांची अनू.जाती शहराध्यक्ष म्हणून तर माधव पवार यांची सरचिटणीस पदावर निवड करण्यात आल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.त्यांच्या निवडीबद्यल भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष तथा बाजार समितीचे संचालक किशोर पा.लगळूदकर माजी नगरसेवक शेख यूसूफभाई संजय घंटलवार रमेश दूधारे संदिप नरवाडे नागेश सोमेबोईनवाड दिगंबर कदम संतोष मनमंदे सूमेध बनसोडे विजय वाघमारे भगवान जाधव अंकूश चव्हाण प्रमोद चौदंते सूनिल कल्याणकर मधूकर गोवंदे गोटू क्षिरसागर नितीन गेंटेवार श्रिकांत गेंटेवार सह विविध क्षेत्रातील मित्रपरिवारांनी अभिनंदन केले.