मलाबार गोल्ड कंपनीकडून जयभीम मराठी युवकावर अन्याय; आंदोलनाची तयारी

- मुंबई | अंधेरी (पूर्व):अंधेरी पूर्व येथील मलाबार गोल्ड या नामांकित कंपनीत कार्यरत असलेला जयभीम मराठी युवक आदित्य भोरखाडे याच्यावर कंपनी प्रशासनाकडून अन्याय केला जात असल्याचा आरोप आहे. कोणतेही ठोस कारण नसताना त्याची इतर राज्यात बदली करण्याचा प्रयत्न होत असून, मागील महिन्याभरापासून त्याला कामावरून घरी बसवण्यात आले आहे.पीडित युवकाच्या मते, कंपनीतील एका मुस्लिम व्यवस्थापकाने’ चा मुद्दा पुढे करत त्याला महाराष्ट्राबाहेर पाठवण्यासाठी दबाव आणला. आदित्य भोरखाडे याने स्पष्टपणे सांगितले की, तो मराठी भाषिक आणि जयभीम विचारसरणीचा असल्यानेच त्याच्यावर हे जाचक पद्धतीने खच्चीकरण केले जात आहे. कंपनीने मुद्दाम बदलीचे आदेश देऊन त्याला मानसिक त्रास देत नोकरी सोडायला भाग पाडण्याचा प्रयत्न केला आहे.या प्रकारावरून वंचित बहुजन आघाडी, शिंदे गट, शिवसेना, मनसे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, आणि शेतकरी-कमगार पक्ष यांनी तीव्र निषेध व्यक्त केला असून, संबंधित कंपन्येविरोधात आंदोलनाचा इशारा दिला आहे.वंचित बहुजन आघाडीचे समन्वयक बॉबी जाधव, नेते वैजनाथ गायकवाड, तालुकाध्यक्ष बेडगेकर, महासचिव चंद्रकांत घाडगे,आरपीआयचे योगेश गायकवाड,शेकाप नेते हरिभाऊ कांबळे,महिला नेत्या शीतल कांबळे,मनसे व शिंदे गटाचे कार्यकर्ते यांनी जाहीर केले की, जर आदित्य भोरखाडे याला तात्काळ कामावर घेतले नाही, तर जातीय अत्याचार प्रतिबंधक कायदा (Atrocities Act) अंतर्गत संबंधित व्यवस्थापनावर कारवाईची मागणी केली जाईल. त्याचप्रमाणे तीव्र आंदोलन उभारण्यात येईल.”मराठी माणूस शांत बसणार नाही. जयभीम युवकांवर अन्याय सहन केला जाणार नाही,” असा इशारा संबंधित संघटनांनी दिला आहे.