‘हल्ली टीव्हीवर पाहा किंवा सोशल मीडियावर एक दुसरी जाहिरात ही ऑनलाईन गेमिंगचीच असते. एखादी म्हातारी बाई येते आणि मी रम्मी खेळून २ कोटी रुपये जिंकले असं सांगतेय. बरं हे कमी की काय मराठी, हिंदीचे अभिनेते हे रम्मी कसं खेळायचं याची जाहिरात बाजीही करतात. गमंत म्हणजे, अलीकडे तर अभ्यास करून खेळा, असा अजब सल्ला देणारे अभिनेते खुशाल जाहिराती करताय.पण रिअल लाईफमध्ये या ऑनलाईन रम्मी आणि इतर गेमच्या नादी जाऊन अनेक कुटुंब उद्धवस्त झाली आहे. पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवडध्ये एका तरुणाने ऑनलाइन रम्मीच्या नादात ८४ लाखांचं कर्ज केल्याचं प्रकरण समोर आलं आहे.

पिंपरी चिंचवड मध्ये राहणारा सोलापूर जिल्ह्यातील करमाळा येथील तरुण जय जाधव याचीही कहाणी आहे. जय जाधव हा रिअल इस्टेट व्यवसायात काम करतोय. पण त्याला एका मित्राने त्याला रम्मी खेळण्याचा नाद लावला अन् बघता बघता त्याने थोडे फार नाहीतर तब्बल ८४ लाखांचं कर्ज केलं. रिअल इस्टेटच्या व्यवसायातून जयने उभे केलेले 23 लाख, मित्रमंडळीकडून घेतलेलं 20 लाखांचं कर्ज, एवढंच नाही तर गावाकडील दीड एकर शेती आणि स्कॉर्पिओ गाडी गहाण ठेऊन त्यानं 20 लाखांचं कर्ज उचललं होत.हे सर्व तो आता गमावून बसला आहे!

भावांनो गमवायला नाही कमवायला किती दिवस रात्री लागतात ते पहा आई वडिलांचे आणि स्वतःचे स्वप्न डोळ्यासमोर ठेवा आणि असल्या फालतू खेळा पासून लांब रहा!

शेवटी जे कुणी अभिनेते या जुगाराची जाहिरात करतात त्यांची मुलं अमेरिका, इंग्लंड, अश्या देशात शिकतात आणि हे भडवे आपल्या गरीब मुलांना रम्मी खेळा म्हणून सांगतात.अमिषाला बळी पडू नका रम्मी खेळून जर माणूस श्रीमंत होत असेल तर यांनी अभिनय सोडून रोज रम्मीच खेळली असती.

जाता जाता मी रम्मी खेळायला तयार आहे जाहिरात करणारे अभिनेते आणि त्यांच्या मुला मुली सोबत….