भोकर(प्रतिनिधी)भोकर येथे दि.०१ ऑगस्ट २०२५ रोजी साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याच्या नियोजित जागी ध्वजारोहण करण्यात आले भोकर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामजी कराड व यांच्या हस्ते ध्वजारोहण करून प्रतिमेचे पूजन करण्यात आले तर क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांच्या नियोजित जागेवर भोकर तहसीलचे तहसीलदार विनोद गुंडमवार यांच्या हस्ते लहुजी वस्ताद साळवे यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून ध्वजारोहण करण्यात आले यावेळी असंख्य सामाजिक कार्यकर्ते समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी भोकर तालुक्याचे भोकर नगर परिषदेचे माजी नगरसेवक मनोज गिमेकर, माजी नगरसेवक प्रतिनिधी तथा नगरपरिषद कर्मचारी सामाजिक कार्यकर्ते दिलीप वाघमारे
सखाराम वाघमारे शिवसेनेचे संतोष आलेवाड नामदेव वाघमारे ज्येष्ठ संपादक उत्तम बाबळे लोकमतचे पत्रकार राजेश वाघमारे लसाकमाचे माजी तालुका अध्यक्ष निवृत्त कर्मचारी माहूरकर अण्णा कॉम्रेड दिलीप पोत्रे सामाजिक कार्यकर्ते के.वाय देवकांबळे उद्योजक सखाराम वाघमारे बबलू काळे बालाजी काळे महेंद्र किनीकर चंद्रकांत बाबळे अविनाश वाघमारे परमेश्वर भालेराव गंगाधर करंदीकर असंख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी ध्वजारोहणाच्या नंतर लागलीच नवनिर्वाचित अध्यक्षाची निवड करण्यात आली यावेळी सर्वांनुमते
सार्वजनिक जयंती मंडळ भोकरच्या अध्यक्षपदी सर्व समाजाच्या वतीने पत्रकार अनिल डोईफोडे यांची निवड करण्यात आली व उपाध्यक्षपदी गंगाधर करंदीकर सचिव बबलू काळे कोषाध्यक्ष बालाजी वाघमारे सहसचिव के. वाय. देवकांबळे सह कोषाध्यक्षपदी महेंद्र किनिकर व सदस्य संतोष सूर्यवंशी संतोष झुंजारे सुधीर वाघमारे लक्ष्मण सुरेशकर सल्लागार सखाराम वाघमारे आदी पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली व पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आले.