भोकर :- पूर ग्रस्त गावात जिल्हा आरोग्य अधिकारी नांदेड डॉ संगीता देशमुख मॅडम व जिल्हा हिवताप तथा हत्तीरोग अधिकारी नांदेड डॉ अमृत चव्हाण, तालुका आरोग्य अधिकारी भोकर डॉ संदेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली भोकर तालुक्यातील पूर ग्रस्त गावात आरोग्य विषयक प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्र मातुळ, किनी अंतर्गत मौजे नांदा, रेणापूर गावात किटकजन्य व जलजन्य आजाराविषयी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्या बाबत व कोणत्याही साथीच्या रोगांचा उद्रेक होवु नये या बाबत खबरदारी कशी घ्यावी बाबत सदरील गावातील ग्रामस्थांनाना मार्गदर्शन करण्यात आले. सर्व प्रकारच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या त्यात प्रामुख्याने बी टी आय पावडर अळी नाशक फवारणी, मीथेलोन औषधी डस्टिंग व तसेच कंटेनर सर्वे व आबेटिंग, डास संकलन करून सोबत प्रभावी आरोग्य शिक्षण देण्यात आले आहे. या मोहिमेत तालुका आरोग्य पर्यवेक्षक पेंढारे मोहन, हत्तीरोग आरोग्य निरीक्षक पुलकंठवार व्यंकटेश, कनिष्ठ कीटक शास्त्रज्ञ निकिता कांबळे, आरोग्य कर्मचारी धुमाळे संजय, गजानन कंकाळ, क्षेत्र कर्मचारी रविंद्र चव्हाण, राजू चव्हाण, इंदल चव्हाण आणि मारोती गेंदेवाड आदी इतर सर्व कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply