ग्रामीण रुग्णालय भोकर येथे दुर्बीणीद्वारे (लॅप्रोस्कोपी) स्त्री कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबीराचे दि ११ नोव्हेंबर रोजी आयोजन
भोकर :- कुटुंब नियोजना मध्ये स्त्री कुटुंब नियोजन शस्रक्रिया करण्यात येत असतात. नांदेड जिल्हा शल्य चिकित्सक डॉ संजय पेरके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ संगीता देशमुख, निवासी वैद्यकीय अधिकारी (बाह्य) डॉ राजाभाऊ बुट्टे यांच्या मार्गदर्शनानुसार ग्रामीण रुग्णालय भोकर येथे दुर्बीणीद्वारे (लॅप्रोस्कोपी) स्त्री कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबीराचे दि ११ नोव्हेंबर रोजी आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती डॉ प्रताप चव्हाण वैद्यकीय अधिक्षक ग्रामीण रुग्णालय भोकर, डॉ. संदेश जाधव तालुका आरोग्य अधिकारी भोकर यांनी दिली.
भोकर शहर व तालुक्यातील नागरिकांना कळविण्यात येते कि, ग्रामीण रुग्णालय भोकर येथे दि ११ नोव्हेंबर रोज मंगळवारी दुर्बीणीद्वारे (लॅप्रोस्कोपी) स्त्री कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन करण्यात आलेले आहे.
प्रसिद्ध लॅप्रोस्कोपी सर्जन डॉ. संतोष अंगरवार, सर्जन डॉ.अनंत चव्हाण हे शस्त्रक्रिया करणार आहेत सोबत भुलतज्ञ डॉ बाळासाहेब बिऱ्हाडे, डॉ अस्मिता भालके हे उपस्थित राहणार आहेत.
दि. १० नोव्हेंबर रोज सोमवारी शस्रक्रिया लाभार्थी यांची तपासणी करून योग्य लाभार्थी यांची दुर्बीणद्वारे कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया दि. ११ नोव्हेंबर रोजी करण्यात येईल.
* • दुर्बीणद्वारे ( लॅप्रोस्कोपी ) कुटुंब नियोजन करण्याचे फायदे –
१) लहान चिरे, कमी रक्तस्त्राव त्यामुळे कमी वेदना, लहान डाग.
२) दुसऱ्या दिवशी चालता, फिरता येते, रोजचे जेवण घेता येते.
३) सात दिवस रुग्णालयात भरती राहण्याची गरज नाही.
४) मोफत शस्त्रक्रिया व शासना मार्फत अनुदान देण्यात देते.
तरी स्त्री लाभार्थी यांनी याचा लाभ घ्यावा असे आवहान वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी सर्व ग्रामीण रुग्णालय भोकर, वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र भोसी,किनी,मोघाळी, मातुळ येथील सर्व कर्मचारी यांनी केले आहे.
