एसटी डेपो नांदेड आगार येथे वंदे मातरम्‌‍ गिताचा 150 वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा

नांदेड – वंदे मातरम्‌‍ या गीताला 7 नोव्हेंबर 2025 रोजी 150 वर्षे पुर्ण होत असल्याबद्दल देशभक्ती आणि राष्ट्रीय भावना जागृत करणाऱ्या या गीताचे ऐतिहासिक महत्व अधोरेखीत करण्यासाठी संपूर्ण राज्यामध्ये मोठ्या उत्साहात हा वर्धापन दिन साजरा होत असून राज्य शासनाच्या निर्देशानुसार सर्वत्र वंदे मातरम्‌‍ या गीताचा वर्धापन दिन साजरा होत आहे.
याचाच एक भाग म्हणून आज दि.7 नोव्हेंबर 2025 शुक्रवार रोजी सकाळी ठिक 10.30 वाजता महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी डेपो) नांदेड आगार येथे एसटीचे विभागीय वाहतुक अधिक्षक तथा प्रभारी आगार व्यवस्थापक मा.श्री.मिलींदकुमार सोनाळे यांच्या अध्यक्षतेखाली वंदेमातरम्‌‍ या गीताचे आगारातील सर्व कष्टकरी-कामगार कर्मचारी अनिवार्यपणे उपस्थित राहून सामुहिकरित्या वंदे मातरम्‌‍ गीताचे गाण केले.
यावेळी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक एसटी मेकॅनिक तथा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते मा.श्री.गुणवंत एच.मिसलवाड यांनी करून आपले विचार मांडले. ते आपल्या भाषणात म्हणाले की, वंदे मातरम्‌‍ हे गीत बकिमचंद्र चॅटर्जी यांनी इ.स.1882 मध्ये लिहिले असून 1896 मध्ये कोलकत्ता येथे भारतीय राष्ट्रीय काँॅग्रेस पक्षाच्या अधिवेशनात प्रथमतः रविंद्रनाथ टागोर यांनी गायीले आहे, असे प्रतिपादन केले. ते प्रमुख वक्ते म्हणून बोलताना आपल्या भाषणात पुढे म्हणाले की, या जगाच्या पाठीवर भारत देशाच्या इतिहासाला खूप महत्व असून राष्ट्रगीत आणि वंदे मातरम्‌‍ या गीतामध्ये आपल्या संपूर्ण भारत देशाचा इतिहास अधोरेखीत असून आपण सर्वांनीच या वंदे मातरम्‌‍ गीताच्या 150 व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आदर्शयुक्त रित्या समाजाप्रती-देशाप्रती कार्य करण्याची ही काळाची गरज आहे, असेही ते शेवटी आपल्या भाषणात म्हणाले.
यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून विभागीय वाहतुक अधिक्षक मा.श्री.मिलींदकुमार सोनाळे, चार्जमन योगेश्वर जगताप, एसटी मेकॅनिक तथा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते गुणवंत एच.मिसलवाड, पाळी प्रमुख संजय खेडकर, वरिष्ठ लिपीक सुरेश फुलारी, सौ.श्वेता तेलेवार, वैशाली कोकणे, शिल्पा ढवळे, श्रीमती कदम मॅडम, कृष्णा पवार, यांत्रीक मंगेश कांबळे, सरदार गुरूमितसिंघ यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी रापम आगारातील कष्टकरी कामगार-कर्मचारी, बंधू-भगिनी अनिवार्यपणे बहुसंख्येने उपस्थित होते.

Leave a Reply