लावणी महोत्सवाच्या पायात रुतला काटा ! कलम की ताकत नगरसेवक साई जटालवार च्या मागणीला यश
भोकर : भोकर येथील ग्रामदैवत महादेवांच्या यात्रेनिमित्त १९ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आलेल्या लावणी महोत्सवावर वाद निर्माण झाला असून, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीदिनी असा कार्यक्रम घेणे अयोग्य असल्याची भूमिका नगरसेवक साईप्रसाद जटालवार यांनी मांडली आहे. त्यांनी पोलिस प्रशासनाकडे निवेदन देऊन लावणी महोत्सव तात्काळ रद्द करण्याची मागणी आज यश आले असून १९ महादेव यात्रा समितीमार्फत फेब्रुवारी रोजी भोकर येथे रात्री ८ वाजता बहारदार लावण्यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचे प्रसिद्धीपत्रकातून जाहीर करण्यात आले होते. मात्र, याच दिवशी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी केली जाते. तसेच धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान मासाची सुरुवातही या काळात होत असल्याने हा दिवस शिवप्रमींमध्ये अत्यंत पवित्र मानला जातो. अशा दिवशी लावणीसारखा मनोरंजनप्रधान कार्यक्रम आयोजित करणे योग्य नसल्याचे जटालवार यांनी आपल्या निवेदनात नमूद केले होते या मागणीला आज यश आले असुन नगरसेवक साईप्रसाद जटलवार यांनी कठोर परिश्रम घेतल्यामुळे आज यश आले.
