भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष कार्यालय, भोकर येथे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी.

भोकर :-(विजयकुमार मोरे कोळी)
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष कार्यालय, भोकर येथे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी महाराजांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या पराक्रम, दूरदृष्टी आणि लोककल्याणकारी राज्यकारभाराची आठवण करून दिली.
यावेळी पक्षाचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. वक्त्यांनी आपल्या भाषणात छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेद्वारे समाजात स्वाभिमानाची ज्योत प्रज्वलित केली आणि सर्वधर्मसमभाव, न्यायनिष्ठा व स्त्रीसन्मान यांसारख्या मूल्यांची जपणूक केली, असे नमूद केले. त्यांच्या आदर्शांवर चालत समाजहिताचे कार्य करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.
कार्यक्रमादरम्यान शिवजयंती निमित्ताने ऐक्य, बंधुता आणि राष्ट्रप्रेमाची भावना अधिक दृढ करण्याचा संदेश देण्यात आला.
यावेळी गोविंद बाबा गौड पाटील,श्यामसुंदर पाटील कदम, एल ए हिरे, बंडू पाटील, माधव मेकेवाड,सुरेखा माळे (शहराध्यक्ष,महिला काँग्रेस),सुरेखाताई गजभारे अन्य भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply