तीर्थक्षेत्र पिंपळगाव येथिल रामकथेस भाविकांचा मोठा प्रतिसाद: दत्त याग महायज्ञ साठी मोठी गर्दी

भोकर( बी.आर. पांचाळ ): तीर्थक्षेत्र दत्त संस्थान पिंपळगाव येथे चालू असलेल्या श्रीराम कथेस भाविकांचा मोठा प्रतिसाद मिळत असून 108 कुंडी दत्तयाग महा यज्ञ साठी सुद्धा मोठी गर्दी भाविकांची होत आहे.
पिंपळगाव ता. हदगाव येथील दत्त संस्थान पावन क्षेत्रामध्ये 20 मार्च ते 27 मार्च दरम्यान बालयोगी व्यंकटेश स्वामी महाराज यांच्या नियोजनानुसार भव्य श्रीराम कथेचे आयोजन करण्यात आले असून कथा प्रवक्ते श्री राधा कृष्णाजी महाराज यांच्या रसाळ वाणीतून राम कथा अतिशय सुंदर अशी होत आहे प्रभू रामचंद्राचे जीवन अलौकिक आहे राम कथा श्रवण केल्याने जीवनाचा उद्धार होतो आदर्शवत जीवन म्हणजे राम कथा आहे जीवनात भक्तीचा आनंद घ्या असे राधाकृष्णजी महाराज यांनी सांगितले
* भाविकांची मोठी गर्दी: भाविकांसाठी दररोज महाप्रसाद*
*-*-*-******************************************
तुमचा क्षेत्र दत्त संस्थान पिंपळगाव येथे सुरू असलेल्या रामकथेसाठी भाविक व महिलांची मोठी गर्दी होत आहे 108 कुंडी दत्त याग महा यज्ञ सोहळा अत्यंत सुनियोजित पद्धतीने धार्मिक विधी मंत्रांच्या गजरात साजरा होत आहे भाविक भक्तांसाठी दररोज महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली असून महाप्रसाद घेण्यासाठी भाविकांची गर्दी होत आहे रात्रीला कीर्तनाचा कार्यक्रम देखील अतिशय उत्साहात होत आहे

Leave a Reply