महाराष्ट्र भूमी ही संतांची आहे त्यामध्ये गुरु गोविंदसिंहजी यांचे मोठे योगदान आहे- प.पू. राधाकृष्णजी महाराज
भोकर( तालुका प्रतिनिधी) महाराष्ट्र भूमी ही संतांची भूमी आहे त्यामध्ये नांदेड जिल्हा गुरु गोविंद सिंहजी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला असून त्यांच्या कार्यामुळेच सनातन हिंदू धर्म उभा आहे, गुरु तेग बहादुरजी यांनीही हिंदू धर्माच्या रक्षणासाठी मोठे काम केले असे आध्यात्मिक विचार पिंपळगाव येथील रामकथेत बोलताना कथा प्रवक्ते राधाकृष्णजी महाराज यांनी मांडले.
पिंपळगाव येथील दत्त संस्थान येथे चालू असलेल्या श्री राम कथेत पाचव्या दिवशी 24 मार्च रोजी निरुपण करताना राधा कृष्णाजी महाराज म्हणाले गुरुकृपा ज्यांच्यावर होते त्यांना आत्मबोध होतो, व्यक्तीचा स्वभाव चांगला असावा, गुरूंचा शब्द व्यर्थ जात नाही विश्वास पाहिजे, गृहस्था श्रमात राहून देखील पवित्र सुंदर आणि संस्कारमय जीवन जगता येते, छत्रपती शिवाजी महाराज, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर यांच्यासह अनेक संतांनी वीर पुरुषांनी भारतभूमीसाठी कार्य केलेल आहे धर्मासाठी अनेकांनी बलिदान दिलेलं आहे, या देशात अनेक मोठे उद्योगपती आहेत मात्र धनाच्या बळावर धर्मात्मा होता येत नाही, त्यासाठी सत्कार्य करावे लागते समाजासाठी झिजावे लागते, हिंदू धर्मात जोपर्यंत रामराज्य येणार नाही तोपर्यंत खरे सुख प्राप्त होणार नाही, हिंदू धर्म हा जागृत धर्म असून श्रीरामचंद्र प्रभुंना आपले करून जीवन धन्य करा, जातीभेद न करता सर्वां सोबत आनंदाने जीवन जगा असे सांगून सीता स्वयंवराची कथा सांगितली रामचंद्र प्रभूं वनवासाला निघाल्यानंतर कुठलीही चिंता न करता सरळ निघाले अत्यंत साधेपणाने आदर्शवत जीवन जगले असे सांगून आपण त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून जीवनाची वाटचाल करावी असेही शेवटी महाराज म्हणाले
साधुसंत भक्तांनी महिलांनी घेतला भजनाचा आनंद
तीर्थक्षेत्र पिंपळगाव येथील श्री राम कथा परमपूज्य बालयोगी व्यंकट स्वामी महाराज यांच्या नियोजनानुसार अतिशय सुंदर आणि आनंदी भक्तिमय वातावरणात होत आहे राम कथेमध्ये होत असलेल्या भजनांमुळे भाविकांना मोठा आनंद मिळत असून तल्लीन होऊन महिला भक्तजन नाचून आनंद घेत आहेत साधुसंत मंडळींनी देखील तली न होऊन आनंद घेतला मोठ्या प्रमाणावर बाहेर गावाहून संत मंडळी भक्तमंडळी राम कथेसाठी येत असून भाविकांची मोठी गर्दी उसळली आहे भोजन व्यवस्था पाणी व्यवस्था स्वच्छता अतिशय चांगल्या प्रकारे सर्व भक्त मंडळाच्या वतीने केली जात आहे
