नागापूर येथील हनुमान जयंतीच्या उत्सवात भक्ती आणि सामाजिक एकतेचे दर्शन
50 क्विंटलहुन अधिक उधळले जाते नवसाचे खोबरे
*-*-*-*-*-*-*-*-*-*************
भोकर( उत्सव वार्ता- बी. आर. पांचाळ )
****************************
भारतीय संस्कृतीमध्ये धार्मिक परंपरेतून सामाजिक एकता जपली जाते, अनेक उत्सवा मधून सर्वधर्मसमभाव, धार्मिक परंपरा, सामाजिक एकता, गावामध्ये दिसून येणारी शांतता या सर्व बाबी धार्मिक उत्सवांमधून दिसून येतात भोकर तालुक्यातील नागापूर येथे हनुमान जयंतीचा उत्सव अशाच प्रकारे सामाजिक एकता आणि धार्मिक परंपरा जपणारा असून सर्व जाती-धर्माचे लोक एकत्र येऊन संघटितपणे हा उत्सव साजरा करतात, मागील अनेक वर्षापासून ही परंपरा गावात जपली जाते विशेष म्हणजे नवसाला पावणारा हनुमान म्हणून येथील देवस्थानची ख्याती आहे,हनुमान जयंतीच्या दिवशी मोठ्या प्रमाणात समाज या ठिकाणी जमतो नवसाला बोललेले 50 क्विंटल हुन अधिक खोबरे या उत्सवामध्ये उधळले जाते, सर्व गावकरी आनंद घेतात म्हणूनच नागापूर येथील हा उत्सव आगळा वेगळा आहे.
भोकर तालुक्यातील नागापूर हे गाव पूर्वीपासूनच धार्मिक परंपरा जपणारे आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे विचार या गावांमध्ये रुजलेले आहेत गावातील हनुमान मंदिर हे सर्वांच्या श्रद्धेचे स्थान असून चांदीने मढविण्यात आलेले मूर्ती अतिशय आकर्षक आणि सुंदर आहे भजन पूजन आरती हरिपाठ विविध सण उत्सव गावात साजरे केले जातात धार्मिक उत्सवाबरोबरच गावाने गावाची स्वच्छता देखील जपली आहे ग्रामस्वच्छता अभियान हागणदारी मुक्त गाव स्मार्ट व्हिलेज पाणी आडवा पाणी जिरवा वृक्षारोपण जल संवर्धन व्यसनमुक्ती अशा अनेक कामांमध्ये लोकसहभाग देऊन गावाचे नाव मोठ्या उंचीवर नेलेले आहे महिला पुरुष युवक सर्वच एकत्र मिळून गावाच्या स्वच्छतेसाठी पुढाकार घेतात गावातील रस्ते स्वच्छ आहेत रस्त्याच्या बाजूला नाल्या करण्यात आल्या आहेत, पिण्याचे स्वच्छ पाणी, मुलांना खेळण्यासाठी विविध साधने तयार करण्यात आलेली आहेत, वृक्षारोपण करण्यात आले आहे, शेतीला जाण्यासाठी पानंद रस्ते सुद्धा गावकऱ्यांनी स्वतः श्रमदान करून तयार केले आहेत शासनाच्या विविध योजना गावांमध्ये राबविल्या जातात वरिष्ठ अधिकारी येऊन विविध योजनांची माहिती देतात बचत गटाच्या माध्यमातून महिला सक्षम झाल्या आहेत शाळा अंगणवाडी आरोग्य उपकेंद्र देखील अतिशय चांगल्या प्रकारे सजवण्यात आले आहे गावाच्या संघटन शक्ती आणि एकतेमुळे शासनाचे पुरस्कार गावाला मिळाले आहेत
*हनुमान जयंतीचा आगळावेगळा उत्सव *
****************************
भोकर तालुक्यातील एकमेव नागापूर या गावांमध्ये हनुमान जयंतीचा उत्सव आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो हनुमान जयंतीच्या दिवशी गावातील सर्वच अधिकारी कर्मचारी बाहेरगावी असलेले सर्व मान्यवर गावात येतात. हनुमान जयंतीच्या पूर्वी सात दिवस अगोदर टाळ पारायण सुरू केले जा ते,भजनाचे कार्यक्रम होतात मंदिरासमोर हिरवा मांडव टाकल्या जातो, मानकरी यांच्या हस्ते पूजा करून प्रसाद चढविल्या जातो हनुमान जयंतीच्या दिवशी गावामध्ये उत्साह व आनंदाचे वातावरण असते सर्वच लोक या उत्साहामध्ये सहभागी होतात मंदिरासमोर मोठी गर्दी झालेली असते, भजन दिंड्या व जयघोषाने गाव दुमदुमून जाते चांदीमध्ये बनवण्यात आलेली हनुमानाची मूर्ती नवसाला पावते नवस फेडण्यासाठी अनेक भक्तजन साखर तुला देखील करतात, खोबऱ्याची उधळण केली जाते, सोन्या चांदीचे दागिने देखील देवाला अर्पण केले जातात, नगदी स्वरूपात देखील देणगी दिल्या जाते, जयंतीच्या दिवशी महाप्रसादाचा कार्यक्रम होतो त्यानंतर पुढे आठ दिवस महाप्रसाद चालूच असतो. खोबऱ्याची उधळण हा आनंदाचा क्षण असून अनेक भाविक आपल्या नवसाचे खोबरे उधळतात आनंदाच्या वातावरणामध्ये हा कार्यक्रम साजरा होतो भक्तमंडळी मोठ्या प्रमाणावर खोबरे उधळण्यासाठी जमतात, 50 क्विंटल हुन अधिक खोबऱ्याची उधळण या ठिकाणी केली जाते म्हणूनच नागापूर येथील हनुमान जयंतीचा उत्सव आगळावेगळा असून भावभक्तीचा, धार्मिक परंपरेचा, गावाच्या एकतेचा संगम आहे.
