पुजा गुलेवाड यांची पोलीस दलात निवड झाल्याने नगर वासीया कडून सत्कार

पुजा गुलेवाड यांची पोलीस दलात निवड झाल्याने नगर वासीया कडून सत्कार
भोकर(प्रतिनिधी)येथील एका सामान्य कुटुंबातील कन्या कु .पुजा रामराव गुलेवाड यांची धुळे जिल्हा पोलीस दलात निवड झाल्याने प्रफूल्ल नगरवासीयांच्या वतीने सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या.
शहीद प्रफुल्ल नगर भागातील एका सामान्य कुटुंबात जन्मलेली वडील बांधकाम व्यवसायीक आई गृहीणी असतांनाही जिद्य आणि मेहनतीच्या बळावर अशक्य गोष्ट शक्य करता येते कु. पुजा हिने पाटील अकॅडमी किनवट येथे अभ्यासासह सराव करून यश संपादन केल्याने प्रफूल्ल नगरातील लोकांनी तीचा सत्कार केला. या वेळी नगसेवक संजय घंटलवार,अकॅडमी प्रमुख संतोष पाटील, नगसेवक प्रतिनिधी विकास क्षिरसागर, मुख्याध्यापक बी. जी गाडे , संतोष शहा, सुनिले शहा, उदयकुमार सुर्यवंशी,नंदकुमार कुरुकवाड,पत्रकार अरुण डोईफोडे, बी. एस. सरोदे, संदीप नरवाडे, संतोष मनमंदे, यांनी शाल,पुष्पहार देऊन कु.पुजा गुलेवाड यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुत्रसंचालन आभार बी. एन.कांबळे यांनी मानले .

Leave a Reply