नांदेड जिल्ह्यातील दरोड्याचा प्रयत्न उधळला: ५ आरोपींपैकी ३ अटकेत, धारदार शस्त्रे आणि मोटारसायकली जप्त.

भोकर:- (प्रतिनिधी)
नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी गुन्हेगारांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश भोकर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अजित कुंभार यांना दिले होते. या आदेशाचे पालन करत, दिनांक ०७.०७.२०२५ रोजी गोपनीय माहितीदारांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पोमनाळा ते सावरगाव फाटा रोडवरील सोनारी शिवारातील वळण रस्त्यावर काही इसम मोटारसायकलसह धारदार शस्त्रे बाळगून दरोडा टाकण्याच्या इराद्याने अंधारात दबा धरून बसलेले होते.या खात्रीशीर माहितीच्या आधारे, पोलीस अधिकारी व अंमलदार तात्काळ घटनास्थळी रवाना झाले. दोन पंचांना बोलावून मौजे सोनारी फाट्याजवळील वळण रस्त्यावर सापळा रचण्यात आला. दिनांक ०८.०७.२०२५ रोजी ००.१५ वाजता छापा मारला असता, घटनास्थळी एक विधीसंघर्षित बालक मिळून आला, तर इतर पाच इसम अंधाराचा फायदा घेऊन शस्त्रांसह पळून गेले.मिळलेल्या विधीसंघर्षित बालकाची झडती घेतली असता, त्याच्या कमरेला एक खंजीर मिळून आला. त्याला विश्वासात घेऊन त्याच्यासोबत असलेल्या व पळून गेलेल्या इसमांबाबत विचारपूस केली असता, त्याने त्यांची नावे १) गजानन ऊर्फ बाळा वसंत जळते (वय २४ वर्षे), २) उमेश गुणाजी आठवले (वय १९ वर्षे), ३) विठल ऊर्फ विक्रम देवानंद सावते, ४) कृष्णा यशवंत पवार (रा. बारड), ५) अजिंक्य गोविंदे (रा. खैरगाव) अशी असल्याचे सांगितले. ते त्यांची मोटारसायकल घटनास्थळीच सोडून पळून गेल्याचेही त्याने सांगितले.पोलीस स्टाफ आणि स्थानिक लोकांच्या मदतीने परिसरात शोध घेतला असता, १) गजानन ऊर्फ बाळा वसंत जळते (वय २४ वर्षे), २) उमेश गुणाजी आठवले (वय १९ वर्षे) आणि ३) विठल ऊर्फ विक्रम देवानंद सावते हे मिळून आले.जप्त केलेला मुद्देमाल:आरोपी उमेश गुणाजी आठवले याच्याकडून एक खंजीर आणि एक रेडमी कंपनीचा मोबाईल.आरोपी गजानन ऊर्फ बाळा वसंत जळते याच्या अंगझडतीतून एक तलवार.आरोपी विठल ऊर्फ विक्रम सावते याच्या अंगझडतीतून एक ओपो कंपनीचा मोबाईल.घटनास्थळावरून २ मोटारसायकली (MH-26-BZ-3157 आणि MH-26-CL-1670) आणि एक रेडमी कंपनीचा मोबाईल.एकूण १,४०,७००/- (एक लाख चाळीस हजार सातशे रुपये) किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.आरोपींना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता, ते त्यांची मोटारसायकल घेऊन दरोडा टाकण्यासाठी एकत्र जमून अंधारात दबा धरून बसले असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्यासोबत पळून गेलेल्या इतर इसमांची नावे कृष्णा यशवंत पवार (रा. बारड) आणि अजिंक्य गोविंदे (रा. खैरगाव) अशी आहेत.सर्व आरोपींविरुद्ध पोलीस स्टेशन भोकर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी क्रमांक ०१ ते ०३ यांना अटक करून मा. न्यायालयासमोर हजर केले असता, त्यांना दिनांक ११.०७.२०२५ पर्यंत पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली आहे. सदर गुन्ह्याचा अधिक तपास चालू आहे.या कारवाईत सहभागी पोलीस अधिकारी व अंमलदार:मा. श्री. अविनाश कुमार, पोलीस अधीक्षक, नांदेड, मा. श्री. सुरज गुरव, अपर पोलीस अधीक्षक, नांदेड, मा. श्रीमती अर्चना पाटील, अपर पोलीस अधीक्षक, भोकर, आणि मा. श्री. संजीवन मिरकले, पो. नि. चार्ज उप.वि.पो. अधिकारी, उप.वि भोकर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. अजित कुंभार (पोलीस निरीक्षक) आणि श्री. सुरेश जाधव (पोलीस उपनिरीक्षक) तसेच पोलीस अंमलदार १) पो.हे.कॉ./ २०७८ सोनाजी लक्षटवार, २) पोकों गुरुदास आरेवार, ३) पोकों/ बालाजी बुलबुले, ४) पोकों / भागवत चिंचाणे, ५) चापोहेकों/ ५०७ सतीश कदम, ६) चापोकों १०५ पंकज हनवते यांनी ही यशस्वी कारवाई केली. मा. श्री. अविनाश कुमार, पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी या कारवाईचे कौतुक केले आहे.