भोकर( प्रतिनिधी)भोकर येथील महामानव,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर ( पुतळा) स्मारक समितीच्या अध्यक्षपदी आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते एल.ए.हिरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली तर कार्याध्यक्षपदी सा.कार्यकर्ते दिलीप के.राव यांची तर सचिवपदी गौतम कसबे यांची निवड करण्यात आली आहे.
भोकर येथील मुख्य चौकात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्यासाठी सोमवार दि.११ऑगस्ट २५ रोजी सेवानिवृत्त मुख्याध्यापक एन.के.कांबळे यांचे अध्यक्षतेखाली माऊली मंगल कार्यालयात तालुक्यातील समाज बांधवांची मोठी बैठक घेण्यात आली.भोकरच्या मुख्य चौकात १९७२ पासून डॉ.आंबेडकर पुतळ्याची नियोजित जागा आहे.या जागेवर अनेकांनी आपली दुकाने थाटून अतिक्रमण केले होते ते अतिक्रमण काढण्यासाठी दलित पँथर ते आंबेडकरी संघटनांनी आंदोलन मोर्चे केली.२०२४मध्ये नगर परिषदेने अतिक्रमण हटविले या जागेवर भव्यदिव्य पुतळा उभारावा म्हणून बैठक घेण्यात आली.बैठकीत पुतळा समिती गठीत करून कामाला लागण्याचे ठरले.प्रथम अध्यक्षपदासाठी चार ते पाच नावे पुढे आली त्यानंतर सर्वांनी माघार घेतल्यामुळे चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते एल.ए.हिरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे‌.
सचिव पदासाठी सहा नावे पुढे आली तेंव्हा मतदान घेण्यात आले अटीतटीच्या लढतीत गौतम कसबे यांना बहुमत पडल्याने त्यांची सचिवपदी निवड झाली.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारक समितीचे पदाधिकारी असे अध्यक्ष एल.ए.हिरे,कार्याध्यक्ष दिलीप के.राव,उपाध्यक्ष गोविंद गायकवाड,सुलोचना ढोले, कोषाध्यक्ष म्हणून दत्ता डोंगरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.उर्वरित सदस्य निवडण्याचे अधिकार पदाधिकाऱ्यांना देण्यात आले.
निवड झाल्यानंतर बोलतांना हिरे म्हणाले बाबासाहेबाचा पुतळा उभारणे जोक नव्हे त्यासाठी काय काय करावे लागते याची सविस्तर माहिती दिली.मी जरी अध्यक्ष असलो तरी तुम्ही सर्वच पदाधिकारी अध्यक्ष आहोत म्हणून एक दिलाने कामाला लागले पाहिजे माझा संघर्ष १९७८ नामांतर लढ्यापासून ते भुमिहीन गायरान कास्तकार, बेघरवासीय गोरगरीब लोकांवर झालेल्या अन्याय अत्याचारा विरोधात अनेक वर्ष मोर्चे आंदोलने काढण्यात गेले शेवटच्या टप्प्यात जग बदलणाऱ्या आपल्या बापाचा पुतळा उभारला पाहिजे हे स्वप्न सर्वांच्या सहकार्याने पुर्ण करायचे असल्याचे सांगितले.
या बैठकीत बॅकेचे सेवानिवृत्त अधिकारी अशोक क्षिरसागर यांनी एक लाखाची देणगी जाहीर केली तर दत्ताजी डोंगरे,एन.के.कांबळे यांनी प्रत्येकी एकावन,एकावन हजार रुपये देणगी जाहीर केली.राष्ट्रपाल नारायण इंगोले यांनी ११ हजाराची देणगी जाहीर केली आहे.यावेळी भंन्ते संघशासन,डॉ.मनोज गिमेकर,मिलिंद गायकवाड,भीमराव दुधारे,सुभाष तेले यांनीही मनोगत व्यक्त केले सूत्रसंचालन राजेश चंद्रे यांनी केले तर आभार शाहिर बाबुराव गाडेकर यांनी मानले.यावेळी यावेळी जेष्ठ नेते शिवाजी पा.किन्हाळकर,बौध्द महासभेचे ता.अध्यक्ष एस.आर.जोंधळे,उत्तम एडके,अप्पाराव येरेकर,पत्रकार सिद्धार्थ जाधव,सुनिल कांबळे,अशोक जाधव,आनंद एडके,साहेबराव मोरे,गणपत कानिंदे आदिसह अनेकांची उपस्थिती होती.

Leave a Reply