वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनच्या वतीने ॲड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांचा वाढदिवस स्वाभिमान दिन म्हणून साजरा…

Adiwasi kranti Marathi news चिमुकल्यांनी केक कापून तसेच वृध्द सेवाश्रम मधील वृध्द आई बाबा मिठाई खाऊ घालून साजरा केला वाढदिवस…
सांगली
दि. १० मे २०२३
वंचित,पीडित आणि दुर्लक्षित घटकांचा बुलंद आवाज,महाराष्ट्रच नव्हे तर देशभरातील अग्रगण्य नेत्यांमधील एक अभ्यासू,विद्वान नेतृत्व,बहुजन हृदयसम्राट श्रद्धेय ॲड.प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त वृध्द सेवाश्रम मध्ये राहात असणारे वृध्द आई व बाबांना मिठाई खाऊ घालुन त्याचबरोबर श्रमिक कष्टकरी बांधकाम कामगारांची मोफत ऑनलाईन कामगार नोंदणी करण्यात आली. वंचित बहुजन आघाडी सांगली जिल्हा मध्यवर्ती संपर्क कार्यालय, विश्वशांती बौद्ध विहारात लहान मुलांच्या हस्ते वाढदिवसाच्या केक कापण्यात आला. श्रमिक नगर मधील कष्टकरी बांधकाम कामगारांच्या गरजू विद्यार्थ्याना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले, शैक्षणिक साहित्य हे डॉ.सुधिरजी कोलप सर, इ. महंमदहनिफ मुल्ला साहेब, उद्योगपती रमाकांतभाऊ घोडके, मा. दिलीप गाडे साहेब, आणि मा.सुरेश आठवले साहेब यांनी उपलब्ध करून दिले. वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन, सांगली जिल्हा यांच्या मार्फत, श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस विविध उपक्रमांचे चोख नियोजन वंचित बहुजन आघाडी आणि वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन सांगली जिल्हा संघटक तथा जिल्हा संपर्कप्रमुख संजय भूपाल कांबळे यांनी केले. श्रद्धेय आद.बाळासाहेब आंबेडकर यांच्या जन्म दिवस मोठ्या आनंदात उत्साहाने साजरा करण्यात आला. यावेळी, वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनचे पश्चिम महाराष्ट्र महासचिव प्रशांत वाघमारे साहेब तसेच सांगली जिल्हा संपर्कप्रमुख संजय कांबळे, महासचिव अनिल मोरे सर, जिल्हा संघटक संदिप कांबळे,
कवठेमहांकाळ तालुका महासचिव विज्ञान लोंढे, सचिन वाघमारे, सांगली शहर अध्यक्ष शिवाजी उर्फ पवन वाघमारे, जिल्हा उपाध्यक्ष मानतेश कांबळे, सिद्धार्थ कांबळे, मिरज तालुका महासचिव सागर आठवले,आनंद कांबळे, विक्रांत सादरे, शिवकुमार वाली, विक्रांत गायकवाड, शुभम भंडारे,मऱ्याप्पा राजरतन, असलम मुल्ला, प्रदिप मनचद, बंदेनवाज राजरतन,संगाप्पा शिंदे, मंजूनाथ कांबळे, ऋषिकेश माने यांच्या बरोबर पदाधिकारी कार्यकर्ते, सदस्य आणि कामगार व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.