Adiwasi kranti Marathi news portal
भोकर (तालुका प्रतिनिधी) भारतीय प्राचीन संस्कृती परंपरा यामध्ये योग साधनेला अनन्यसाधारण महत्त्व आहे प्राचीन काळापासून ऋषीमुनींनी साधुसंतांनी योगाचे महत्त्व पटवून दिले, आजच्या धकाधकीच्या जीवनात योगाच्या माध्यमातून आपले शरीर तंदुरुस्त ठेवू शकतो, योगामुळे जीवनात आनंद मिळतो आरोग्य चांगले राहते असे विचार भोकर तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष बी.आर, पांचाळ यांनी भोकर येथील ऑक्सफर्ड इंग्लिश स्कूल येथे योग दिनानिमित्त बोलताना व्यक्त केले
, 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त भोकर शहर व तालुक्यात विविध ठिकाणी योग दिवस साजरा करण्यात आला, देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून 21 जून 2014 पासून आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात येतो त्यानिमित्त 21 जून 2023 रोजी शहरातील शाळा महाविद्यालय, ग्रामीण भागातील शाळा विविध संस्था, या ठिकाणी योग दिवस साजरा करून प्रात्यक्षिक घेण्यातआले
भोकर येथील ऑक्सफर्ड इंग्लिश स्कूलमध्ये योग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून पत्रकार बी, आर, पांचाळ यांची उपस्थिती होती, योग गुरु डॉक्टर विजयकुमार दंडे यांनी छोट्या बालकांना योग प्राणायाम ध्यान याविषयी प्रात्यक्षिक घेऊन अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यासाठी विद्यार्थ्यांनी दररोज व्यायाम योगा केला तर त्यांच्या भविष्यात चांगले यश मिळू शकते असे मत व्यक्त केले, जगभरातील देशांनी योग स्वीकारला आहे जगभरात अनेक देशात योग दिन साजरा होतो 5 हजार वर्षापूर्वीची परंपरा भारताला आहे शरीर, मन, समाज आरोग्य साठी योगा महत्त्वाचा आहे असेही शेवटी बी,आर, पांचाळ यांनी सांगितले, येथील युथीकायोगा अँड वेलनेस सेंटर येथे सकाळी सहा वाजता योगाचार्य डॉंंविजयकुमार दंडे, योग शिक्षिका धम्मशिला दंडे यांनी योगा बद्दल माहिती देऊन योग करून घेतले, बाल योग प्रशिक्षक कुमारी युथिका दंडे हिने सर्व प्रात्यक्षिक विद्यार्थ्यासमोर सादर केले यावेळी संस्थापिका श्रीमती अर्चना कदम ,मुख्याध्यापक भाऊसाहेब दांडेकर, सहशिक्षक विजय गोरटकर ,दासराव कळसकर, राजेश वाघमारे, शंकर कदम, महेश नारलावार, सुनील मुरगुलवार, विकास क्षीरसागर, सतीश देशमुख, ऍड, रवी खाडे, दयानंद गुंडेराव, अरुण डोईफोडे यांच्यासह सर्व योगसाधक व विद्यार्थी उपस्थित होते

Google Ad