खडकपुरा येथील पुरग्रस्तांना सय्यद मोईन यांच्याकडून तब्बल 2200 अन्नधान्यच्या किटचे वाटप
भोकर (लतीफ शेख)एमआयएम पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष सय्यद मोईन यांनी खडकपुरा येथील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी धावले असून पुरामुळे आपल्या घरात मध्ये होतो ते नव्हतं झाल्यामुळे निराश व उपाशी असलेल्या खडकपुरा येथील तब्बल 2200 जणांना अन्नधान्याच्या किट व विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप केले .
गोदावरी च्या पुरा मुळे अनेकांच्या घरात होत ते नव्हत अस झाल आहे पुरामुळे सर्वांचेच नुकसान झालेले आहे सर्वांनाच मदतीची अत्यंत गरज आहे हे पाहून आपल्या सामाजिक दायित्व समजून एमआयएम पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष सय्यद मोईन यांनी दिनांक 27 सप्टेंबर रोजी अबरार फंक्शन हॉल येथे खडकपुरा भागातील सर्व जाती धर्मातील पुरग्रस्तांना मुफ्ती आयुब कास्मी ,अलीम चाऊस ,पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम, शेख असिफ अली, पत्रकार प्रल्हाद कांबळे, शहिबास खान अलताफ सर हुसेन पहेलवान नजिर सर सहित , खडकपुरा येथील एमआयएमच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्तिथीत अन्नधान्याच्या किटचे वाटप केले व तसेच साजिद खान यांचा मुलगा अमान खान वय 17 याचा पुराच्या पाण्यात बूडून मृत्यू झाला होता सय्यद मोईन यांनी त्यांच्या घरी जाऊन 50 हजार रुपयाची आर्थिक मदत केली व तसेच दोन घराचे नुकसान झाले होते त्या कुटुंबीयांना प्रत्येकी 15000 व 10.000 हजार रुपयांची रोख मदत केली ज्या विद्यार्थ्यांचे शालेय साहित्य वाहून गेलेले आहे त्यांना लवकरच शालेय साहित्य वाटप केले त्यांच्या या कार्याचे नांदेड जिल्ह्यामध्ये सर्वत्र कौतुक होत आहे
