जुन ते ऑक्टोबर या कालावधीतील अतिवृष्टी व पुर बाधितांना निधीचे वाटप

नांदेड, दि. 27 ऑक्टोबर : नांदेड जिल्ह्यात माहे जुन ते ऑक्टोबर 2025 या कालावधीत विशेषतः माहे ऑगस्ट 2025 मध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी व पूर झाल्याने जिवीत व वित्तहानी झाली होती. अशा बाधितांना वेळोवेळी तातडीने जिल्हाप्रशासनातर्फे मदत देण्यात आली आहे. सर्व शेतकऱ्यांनी त्यांचे अॅग्रीस्टॅक योजने अंतर्गत फार्मर आयडी काढून घ्यावेत. तसेच केवायसी पूर्ण करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.

27 ऑक्टोबर रोजी साईनाथ मारोती खानसोळे मौ.वासरी ता. मुदखेड जि.नांदेड या व्यतीने आज अंदाजे 1 च्या सुमारास पिक नुकसान अनुदान जमा झाले नसल्याने तहसीलदार मुदखेड यांचे शासकीय गाडीचा समोरील काच फोडून आरडाओरड केली. सदरील व्यतीने मौ.वासरी गावातील गट क्र.371 व 382 मधील पिक नुकसानीचे अनुदान रुपये 6 हजार 290 रुपये संबंधिताचे बॅंक खात्यामधे 8 ऑक्टोबर 2025 रोजी जमा झाले आहेत.

जिल्ह्यात माहे जुन ते ऑक्टोबर 2025 या कालावधीत विज पडून, पुरात वाहून व इतर कारणाने एकूण 36 व्यक्ती मयत झाले असून त्यापैकी 31 प्रकरणात वारसांना प्रत्येकी रु.4 लक्ष प्रमाणे रु.1.24 कोटी इतकी मदत वितरीत करण्यात आलेली आहे. उर्वरीत 5 प्रकरणात कागदपत्रांची पुर्तता होताच मदत वितरीत करण्यात येणार आहे. तसेच नांदेड जिल्ह्यात माहे जुन ते ऑक्टोबर 2025या कालावधीत विज पडून, पुरात वाहून व इतर कारणाने मयत जनावरांची एकूण 673 पात्र प्रकरणे असुन त्यापैकी 619 प्रकरणात रुपये 1.61 कोटी इतकी मदत वितरीत करण्याणत आलेली आहे. उर्वरीत प्रकरणात कार्यवाही सुरु आहे. याच कालाधीत जिल्ह्यातील एकूण 26 हजार 276 कुटुंबांच्यार घरात पाणी शिरुन नुकसान झाले होते. अशा बाधित कुटुंबापैकी 24 हजार 97 कुटुंबांना प्रत्येकी 10 हजार रुपये प्रमाणे 24.09 कोटी रुपये वाटप करण्यात आले असुन उर्वरीत प्रकरणात कार्यवाही सुरु आहे.

नांदेड जिल्ह्यात माहे जुन ते सप्टेबर 2025 मध्ये 9 लाख 35 हजार 703 इतक्या शेतकऱ्यांच्या पिकांचे व शेत जमिनीचे नुकसान झाले होते. त्या अनुषंगाने शासनाकडून मंजुर एकूण रुपये 649.81 कोटी मंजुर रक्कम बाधित शेतकऱ्यांना ऑनलाईन प्रणालीद्वारे वाटप करण्यात येणार असुन आता पर्यंत जिल्हृयातील 6 लाख 13 हजार 993 इतक्या शेतकऱ्यांना 459.91 कोटी इतक्या रकमेचे वाटप करण्यासाठी माहिती ऑनलाईन प्रणालीवर तहसील कार्यालयातून भरण्यात आली आहे. सदर कार्यवाही 70.72 टक्के पूर्ण झाली असुन शेतकरी यांचे खात्यावर थेट मदतीची रक्कम डिबीटी पध्दतीने जमा होत आहे. विशेषतः जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या माहे ऑगस्ट 2025 मधील 82 टक्के शेतकरी यांची माहिती ऑनलाईन प्रणालीवर भरण्यात आली असुन त्यासाठी 453.22 कोटी रक्कम प्रत्यक्ष शेतकरी यांचे खात्यावर डिबीटी पध्द्तीने जमा होत आहे. शेतकऱ्यांनी त्यांचे अॅग्रीस्टॅक योजनेअंतर्गत फार्मर आयडी काढून घ्यावेत, तसेच केवायसी पूर्ण करुन घ्यावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
00000

Leave a Reply