प्रतिनिधी, भोकर येथील भोकर नगर परिषद सार्वजनिक निवडणूक २०२५च्या पार्श्वभूमीवर आज, दिनांक १७ नोव्हेंबर २०२५ रोजी निवडणूक प्रक्रिया अधिक रंगतदार झाली. प्रभाग क्रमांक१ (ब) मधून महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुरस्कृत (अपक्ष) उमेदवार साईप्रसाद सूर्यकांतराव जटालवार यांनी उत्साहपूर्ण वातावरणात आपले नामनिर्देशन पत्र दाखल केले. या वेळी पक्षाचे कार्यकर्ते,स्थानिक नागरिक आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते ते पुढे म्हणाले की सध्या प्रभागातील अनेक प्रश्न प्रलंबित आहेत तुटलेले रस्ते आणि ड्रेनेजची पाणीपुरवठ्याची अनियमितता उपक्रमांचा अभाव ज्येष्ठ नागरिक युवकांसाठी रोजगारमुखी व महिलांसाठी कल्याणकारी या सर्व प्रश्नांवर ठोस पावले अडचण नामांकनानंतर माध्यमांशी संवाद साधताना जटालवारम्हणाले की, “प्रभाग क्रमांक ०१ चा सर्वांगीण विकास करणे ही माझी प्रथम प्राधान्याची जबाबदारी असेल. पाणी,रस्ते, स्वच्छता, आरोग्य, तसेच मूलभूत सुविधा पुरवण्याबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. प्रभागातील प्रत्येक नागरिकाच्या अडचणीच्या काळात मी स्वतः त्यांच्यासोबत उभा राहणार आहे.”योजनांची अपुरी अंमलबजावणी उचलण्याचे आश्वासन जटालवार यांनी दिले. “आमचे राजकारण हे विकासाभोवती फिरणारे असेल. मतदारांनी दिलेला एकही विश्वासघात होणार नाही,’ असेही त्यांनी नमूद केले.नामांकन प्रक्रिया पूर्ण होताच समर्थकांनी फटाके फोडून आणि घोषणाबाजी करत उमेदवारांचे स्वागत केले. अनेक स्थानिक नागरिकांनी त्यांच्याविषयी विश्वास व्यक्त करत प्रभागाच्या विकासासाठी आवश्यक असलेला दृढनिश्चय जटालवार यांच्यात दिसत असल्याचे मत व्यक्त केले. आगामी निवडणुकीत प्रभाग१ (ब) मध्ये तगडी स्पर्धा पाहायला मिळण्याची शक्यता असून, जटालवार यांच्या उमेदवारीमुळे निवडणुकीची रंगतआणखी वाढणार आहे.

Leave a Reply