भोकर नगर परिषदेवर आखिर भाजपाचा झेंडा खा.अशोक चव्हाण यांची खेळी यशस्वी भाजप १३, अपक्ष ७, राष्ट्रवादी २ एकूण २२ नगरसेवक विजयी

भोकर (प्रतिनिधी): भोकर नगर परिषदेसाठी झालेल्या अटीतटीच्या लढतीत मतदारांनी धनशक्तीला स्पष्ट नकार देत समाजसेवेचा वसा स्वीकारलेल्या नव्या व नवतरुण उमेदवारांना संधी दिली आहे. या निवडणुकीत खासदार अशोक चव्हाण यांची रणनीती यशस्वी ठरली असून, इतिहासात प्रथमच भाजपाचा झेंडा भोकर नगर परिषदेवर फडकला आहे.भाजपाचे भगवान दंडवे यांनी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. नगरसेवक पदासाठी झालेल्या चुरशीच्या निवडणुकीत भाजपाने १३जागांवर वर्चस्व प्रस्थापित केले.अपक्ष उमेदवारांनी ७ तर राष्ट्रवादी काँग्रेसला २जागा मिळाल्या. एकूण २२ नगरसेवक निवडून आले.या निवडणुकीत अनेक प्रभागांमध्ये अनपेक्षित निकाल लागले. प्रभाग क्रमांक १ मध्ये गेल्या पंधरा वर्षांपासून सत्तेत असलेले आणि भोकर शहरातील दिग्गज नेते अशोक चव्हाण यांचे कट्टर समर्थक विनोद पाटील चिंचाळकर यांचा दारुण पराभव झाला.नवख्या अपक्ष उमेदवार साईप्रसाद जटलवार यांनी त्यांचा पराभव केल्याने हा निकाल राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला. या निवडणुकीत कॉंग्रेसला एकही जागा मिळवता आली नाही.एमआयएमच्या प्रभावामुळे काँग्रेसचे उमेदवार अनेक प्रभागांत पिछाडीवर राहिल्याचे.चित्र दिसून आले. मुस्लिम मतदारांवर लक्ष केंद्रित करून खा. अशोक चव्हाण यांनी.आखलेली रणनीती काही प्रभागांत परिणामकारक ठरल्याचे निरीक्षण नोंदवले जात आहे. प्रभाग क्रमांक १ मध्येच विद्यमान नगरसेवक व नगरपरिषद सभापती अनिता नाईक यांचा पराभव झाला.वैशाली गणेश बोलेवार यांनी.त्यांच्यावर विजय मिळवला.काँग्रेसचे संदीप गोड विजयी ठरतील अशी चर्चा असतानाही.त्यांना तिसन्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.बहुजन नेते म्हणून ओळखले जाणारे नागनाथ घी हे राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून अध्यक्षपदाचे उमेदवार होते; मात्र अपेक्षित यश न मिळाल्याने ते चौथ्या क्रमांकावर राहिले. प्रभागनिहाय ठळक निकाल प्रभाग १ व यापूर्वी नगरसेवक राहिलेले.जवाजोदिन बडबडेकर व माजी नगराध्यक्ष विनोद चिंचाळकर यांच्याशी झालेल्या अटीतटीच्या लढतीत नवख्या अपक्ष उमेदवार साईप्रसाद जटलवार यांनी कामाच्या जोरावर विजय मिळवला. “काम केल्यासच जनता निवडून देते” हे मतदारांनी पुन्हा सिद्ध केले. नांदेड-मुंबई- थायलंड वाया करणाऱ्या उमेदवाराला मतदारांनी घरचा रस्ता दाखवला. प्रभाग २ शिंदे गटाचे तालुका अध्यक्ष माधव पाटील वडगावकर यांच्या पत्नी लक्ष्मी माधव जाधव यांचा शिल्पा पंकज पोकलवार यांनी पराभव केला. प्रभाग २-ब: माजी सरपंच व नगरसेवक शिवाजी पांचाळ यांचा भाजपाचे विठ्ठल धोंडगे यांनी पराभव केला. प्रभाग ३-अ : कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष गोविंद बाबा गोड यांच्या भावजयी मंजुषा नागनाथ कोडळलवार यांचा निसटता पराभव झाला. प्रभाग ४: बहुजन नेते नागनाथ गिसेवाडे यांच्या पत्नीचा नवख्या उमेदवार सपना राणी पिटलेवाड यांनी पराभव केला. प्रभाग ४-ब माजी नगरसेवक वकील खैराती यांचा कॉंग्रेसच्या युवा उमेदवार सुहास पवार यांनी पराभव केला. प्रभाग ५-ब: भाजपाचे शहराध्यक्ष विशाल माने यांचा अपक्ष उमेदवार राजेश्वर माने यांनी तब्बल ३८३ मतांनी पराभव केला. हा पराभव भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे. प्रभाग ८ भाजपाच्या शिंदे साधना केशव यांचा अर्चना बालाजी बिलरवार यांनी पराभव केला. प्रभाग ९: मामा-भाचा लढतीत भाजपाचे बालाजी पाटील यांचा पराभव करून राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय पाटील कोंढवा विजयी झाले. प्रभाग १०: कॉंग्रेस शहराध्यक्षांच्या पत्नीचा पराभव करत जरीना शेख युसुफ यांनी दमदार विजय मिळवला. प्रभाग ११ : माजी नगरसेवक व राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार केशव मुद्देवाड यांचा नवख्या उमेदवार बालाजी पवार यांनी पराभव केला. मतमोजणी व निवडणूक प्रक्रिया सकाळी दहा वाजल्यापासून नगर परिषदेत मतमोजणीला सुरुवात झाली. दुपारी दोन वाजेपर्यंत अकरा प्रभागांतील बावीस उमेदवारांचे निकाल जाहीर करण्यात आले. निवडणूक निर्णय अधिकारी विनोद गुंडमवार यांनी निवडणूक प्रक्रिया नियोजनबद्ध व शांततेत पार पाडल्याबद्दल सर्व स्तरांतून समाधान व्यक्त करण्यात आले. निकाल जाहीर होताच विजयी उमेदवारांनी विजय रॅली काढून मतदारांचे आभार मानले. या रॅलीत माजी मुख्यमंत्री व खासदार अशोकराव चव्हाण तसेच आमदार जयाचव्हाण यांनी सहभाग नोंदवला. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पोलीस निरीक्षक अजित कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरळीतपणे पार पडली.

Leave a Reply