भोकर :- शीख धर्माचे दहावे गुरु,श्री गुरु गोविंद सिंह महाराज यांचे सुपुत्र श्री साहिबजादे जोरावर सिंह आणि साहिबजादे फतेह सिंह यांनी अत्यंत कोवळ्या वयात दिलेले बलिदान म्हणून २६ डिसेंबर हा दिवस ” वीर बाल दिन ” म्हूणन साजरा करण्यात येतो. त्यानिमित्त आज ग्रामीण रुग्णालय येथे त्यांच्या प्रतिमेस भोकर ग्रामीण रुग्णालयचे वैद्यकीय अधिक्षक डॉ प्रताप चव्हाण यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी डॉ मायादेवी नरवाडे दंत शल्यचिकित्सक, डॉ विनायक थोरवट, सत्यजीत टिप्रेसवार आरोग्य निरीक्षक, गंगामोहन शिंदे औषध निर्माण अधिकारी, श्रीमती साधना भगत अधिपरीचारिका, प्रल्हाद आप्पा होळगे लिपिक, सुरेश डुम्मलवाड समुपदेशक, सुधाकर गंगातिरे आरोग्य मित्र आदी कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply