भोकर शहरातील वाढत्या चोऱ्यांचे प्रमाण लक्षात घेता विविध विभागामध्ये भोकर पोलिसांनी रात्रीची गस्त वाढविले असून चोरट्यावर कडक नजर ठेवली जात असुन.मागील आठवड्यात भोकर शहरामध्ये बँकेतून पैसे काढून.मोटार सायकलच्या डिक्की मध्ये.ठेवलेले दोन लाख रुपये चोरट्यांनी.पळविल्याची घटना घडली त्यानंतर.इतर काही छोट्या मोठ्या चोऱ्यांचे.प्रमाण वाढल्याचे लक्षात घेऊन.पोलीस निरीक्षक अजित कुंभार.यांनी रात्रीची गस्त वाढवली आहे २ चार चाकी वाहने रात्रभर विविध भागात गस्त करतात काही कर्मचारी.मोटार सायकलवर फिरत आहेत.बसस्थानक, रेल्वे स्टेशन, बँका,महाविद्यालय या ठिकाणी पाहणी.करण्यात येत आहे काही गल्लीबोळामध्ये सुद्धा पोलिसांनी रात्रीची रस्त्या वाढविली आहे.शहरातील चोऱ्यांचे प्रमाण लक्षात घेता नागरिकांनी सुद्धा सतर्क रहावे, बाहेरगावी जात असताना घरामध्ये नगदी रक्कम किंवा सोन्या चांदीचे दागिने ठेवू नयेत शेजाऱ्यांना कल्पना देऊन जावे.किंवा पोलिसांना कळवावे रात्रीच्या.वेळी संशयित व्यक्ती दिसून.आल्यास पोलिसांशी संपर्क करावा असे आवाहन पोलीस निरीक्षक.अजित कुंभार यांनी केले आहे.