नांदेड व्ही.आय.पी.रोड वरील महर्षी वाल्मीकी चौक नाम फलक हटवू नये यासाठी कोळी समाज संघटनेच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

मुख्यसंपादक विजयकुमार मोरे पाटील कोळी

नांदेड – व्हीआयपी रोड वरील रस्ता क्र.26 माता गुजरिजी विसावा उद्यानालगत असलेल्या गेल्या 15 वर्षापासून आद्य कवी, रामायन ग्रंथाचे रचनाकार महर्षि वाल्मिकी ऋषी चौक नामफलक आहे. मनपा नांदेड प्रशासनाने विकास कामाअंतर्गत सुरक्षा भिंतीच्या पिल्लरसाठी खड्डे केलेले आहे. तरी आद्य कवी महर्षि वाल्मिकी ऋषी चौक यांच्या नावे असलेल्या नामफलकाला हानी पोहोचू नये व विटंबना होईल असे कृत्य होवू नये, संबंधीत परिसरामध्ये मनपा प्रशासनाला विकास कामे करण्यासाठी बाजूला भरपूर जागा असतांना सुद्धा हीच जागा का नेमण्यात आली. आद्य कवी महर्षि वाल्मिकी ऋषी चौक हे नामफलक कोळी समाजाच्या आस्मीयतेचा प्रश्न असून समाज बांधवांच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न करू नये अशा आशयाचे निवेदन अखिल भारतीय कोळी समाज संघटना नवी दिल्ली शाखा नांदेड जिल्ह्याच्यावतीने नांदेड जिल्हाध्यक्ष मा.श्री. गजानन रामकिशन इरलेवाड यांच्या नेतृत्वाखाली कोळी समाज बांधव शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी कार्यालय, नगर पालीका प्रशासन विभागाच्या जिल्हा सह आयुक्त मा.श्री.गंगाधर इरलोड व मनपा आयुक्त नांदेड, जिल्हा पोलीस अधिक्षक नांदेड यांना या संदर्भाने निवेदन देण्यात आले.या शिष्टमंडळात जिल्हाध्यक्ष गजानन इरलेवाड, गंगाधर जुक्कूलवार, एसटी मेकॅनिक तथा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते गुणवंत एच.मिसलवाड, ॲड.राजकुमार जाधव, मसाजी इरलेवाड, अमोल मालेगांवकर इत्यादींचा समावेश होता.

Google Ad

Leave a Reply