महसुलच्या सुट्टीचा फायदा उचलून रेती वाहतूक करणाऱ्या वाळू माफियांवर अखेर पोलिसांचीच धडक कारवाई; भोकर महसूल प्रशासन मात्र अजूनही बघ्याची भूमिका?
भोकर:(प्रतिनिधी)दर शनिवार – रविवार 50 हून अधिक गाड्या तालुक्यात रेती आणतात,ह्याच महसूल सुट्टीचा फायदा वाळू माफिया वाले उचलतात अशी चर्चा शहरात सुरू आहे.वाळू माफियावर अनेक ठिकाणी पोलिस कार्यवाही होत असली तरी,महसूल प्रशासन अनेक ठिकाणी बघ्याची भूमिका घेत असल्याच्या बातम्या येत आहेत. मात्र, या संदर्भात नवीन धोरणे आणि कठोर कारवाईचे निर्देश दिले जात आहेत.अवैध वाळू उपसा आणि वाहतूक करणाऱ्या वाळू माफियांवर पोलिस (LCB सह) आणि महसूल प्रशासनाकडून वेळोवेळी संयुक्त कारवाई केली जाते. अनेक ठिकाणी महसूल विभागाने मोठ्या प्रमाणात अवैध वाळू जप्त करून लिलाव केल्याच्या घटना आहे.काही प्रकरणांमध्ये वाळू माफियांना स्थानिक पोलिस, राजकीय नेते आणि महसूल विभागातील अधिकारी यांचा पाठिंबा असल्याचा आरोप विधानसभेतही करण्यात आला आहे. यामुळेच महसूल प्रशासनाची भूमिका निष्क्रिय किंवा बघ्याची असल्यासारखे चित्र काही ठिकाणी निर्माण होते.वाळू माफियांवर आता महसूल आणि पोलीस विभाग संयुक्त आणि कठोर कारवाई करतील, तसेच अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांवर दंडासोबतच फौजदारी गुन्हे दाखल केले जातील.वाळू माफियांवर कठोर कारवाई करण्याचे आणि गौण खनिजांच्या नियमनाचे सर्व अधिकार थेट जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
आज दिनांक 25 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी पोलिस निरीक्षक अजित कुंभार यांच्या पथकास मिळालेली गुप्त माहिती अनुषंगाने धडक कार्यवाही आज करण्यात आली त्या कार्यवाही मध्ये दोन मोठ्या हायवा त्यात एका गाडीत अंदाजे 5.5 बरास रेतीची तस्करी होत असल्याचे समजले.सदरील गाडीचे क्रमांक एम एच 46 बी यू 2404 तर दुसऱ्या गाडीला क्रमांक नसल्याचे समजले आहे.गाडी अजून पर्यंत कार्यवाही आणि पंचनामा झाला नसल्याचे समजले पोलिस स्टेशन भोकर येथे दोन्ही गाड्या पोलिस बंदोबस्तात आणल्याचे समजले.सदरील गाड्या ह्या राजकीय पुढाऱ्यांच्या असल्याने अद्याप पर्यंत कार्यवाही झाली नसल्याचे समजले.कार्यवाहीच्या प्रतिक्षेत असल्याचे समजले.पोलिस निरीक्षक अजित कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली एस जे कानगुले (पो हे का),केळकर(पो हे का) आणि तर महसूल कडून एन जी मुळेकर(तलाठी) ह्यावेळी सहभागी होते.
