आजच्या पिढीमध्ये वाचन संस्कृती कमी होत चालली आहे- खा. प्रा. रवींद्र चव्हाण: भोकर मध्ये साहित्य संमेलन.


भोकर( तालुका प्रतिनिधी) साने गुरुजी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांच्यासारख्या महापुरुषांची पुस्तके वाचून ज्ञानामध्ये भर पडत होता मात्र आजच्या पिढीत वाचन संस्कृती कमी होत चालली आहे असे मनोगत खा. प्रा. रवींद्र चव्हाण यांनी भोकर येथील लोकसंवाद साहित्य संमेलनात बोलताना व्यक्त केले.
भोकर येथे तीन जानेवारी रोजी शाहू विद्यालयात यशवंतराव चव्हाण ग्रामविकास व शिक्षण प्रसारक मंडळ शाहू विद्यालय व सेवा समर्पण परिवार यांच्या वतीने 20 वे राज्यस्तरीय लोकसंवाद साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते या संमेलनाच्या अध्यक्षपदी सुप्रसिद्ध साहित्यिक प्रा. महेश मोरे हे होते उद्घाटन खा. रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते झाले प्रारंभी दीप प्रज्वलनानंतर प्रास्ताविक आयोजक दिगंबर कदम यांनी केले यावेळी आपल्या मनोगतामध्ये पुढे बोलताना खा. रवींद्र चव्हाण म्हणाले अशा साहित्य संमेलना मधून ग्रामीण कवी,कथाकार, साहित्यिक घडत असतात,आज वाचन संस्कृतीच कमी झाली आहे अशी खंत व्यक्त करून विद्यार्थी मोबाईल बघण्यात दंग असतात, वाचन करीत नाहीत, वाचन वाढविण्याची गरज आहे, शासनाकडून साहित्य संमेलनासाठी अनुदान मिळवून देण्यासाठी मी प्रयत्नशील राहीन, शालेय पाठ्यक्रमात कृषी शिक्षणाचा समावेश असावा, साहित्यातून चांगली पिढी निर्माण व्हावी असेही शेवटी खा. चव्हाण म्हणाले, स्वागताध्यक्ष शिरीष देशमुख गोरठेकर यांनीही साहित्याची चळवळ विद्यार्थ्यांमध्ये रुजावी असे विचार मांडले, सेवा समर्पण परिवाराच्या वतीने मुख्यमंत्री कार्यालयातील प्रशासकीय अधिकारी राजेंद्र खंदारे व गोदावरी समूहाच्या अध्यक्षा राजश्री पाटील यांना राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले स्मरणिकेचे प्रकाशन शाहीर दिगू तुमवाड यांनी लिहिलेल्या वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबा या पुस्तिकेचे प्रकाशन व आत्माराम राजे गोरे यांनी लिहिलेल्या गावपण हरवत चाललय या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.
साहित्यसंमेलनासाठी 2 लाखाचा निधी- आ. हेमंत पाटील

आजच्या शिक्षक मंडळीनाचा संस्कार देण्याची वेळ आली असून पूर्वी शिक्षकांचीआदर युक्त भीती होती ती आज राहिली नाही दुर्दैवाने पूर्वीसारखे शिक्षकही राहिले नाहीत विद्यार्थ्यांना साहित्याची गोडी लागली पाहिजे मुलांवर संस्कार घडले पाहिजेत आपला इतिहास विद्यार्थ्यांनी विसरू नये असे सांगून जिल्हा नियोजन विकास समितीच्या निधीमधून 2 लाख रुपये लोकसंवाद साहित्य संमेलनासाठी निधी देण्यात येईल असेही आ. हेमंत पाटील यांनी यावेळी घोषित केले . स्पर्धा परीक्षा मधून विद्यार्थी घडावेत- राजेंद्र खंदारे

भोकर तालुक्यात विविध विकास कामांमध्ये सहभाग घेण्याची संधी मला मिळाली जलसंधारण, वृक्षारोपण, शाळेतील विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्र, लोकसभागातून कामे, लोकाभिमुख उपक्रम अशी कामे सर्वांच्या सहभागातून झाली, स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थी घडले पाहिजेत असे मत मुख्यमंत्री कार्यालयातील प्रशासकीय अधिकारी राजेंद्र खंदारे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.पुरस्कारामुळे जबाबदारी वाढली- सौ. राजश्री पाटील
माणसा माणसातील संवाद संपत चाललेला असताना साहित्य संमेलने खूप महत्त्वाचे आहेत साहित्यातून ग्रामीण महिलांचे दुःख मांडण्यात आले पाहिजे मला दिलेल्या पुरस्कारामुळे आणखी काम करण्याची जबाबदारी वाढली आहे विद्यार्थ्यांनी आत्मविश्वास ठेवून असे विचार गोदावरी समूहाचे अध्यक्ष राजश्रीताई पाटील यांनी मांडले

अध्यक्षीय समारोपात प्रा. महेश मोरे यांनी साहित्य वाचना ची गोडी निर्माण झाली पाहिजे असे विचार मांडले या संमेलनास उपविभागीय अधिकारी प्रवीण मेंगशेट्टी, श्रीधर चव्हाण, बाळासाहेब पा. रावणगावकर, मार्तंड कुलकर्णी डॉ. यु.एल. जाधव, गोविंदराव सिंधीकर,देविदास फुलारी, प्रकाश भिलवंडे, गोविंद बाबा गौड, जगन शेळके, बाबुराव कोंडेकर, नागोराव पा. रोशन गावकर, सुरेश बिल्लेवाड, प्राचार्य पंजाब चव्हाण, मुख्याध्यापक संजय सावंत, राजेश्वर रेड्डी लोकावाड यांच्यासह साहित्यिक मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते कवी संमेलन कथाकथन घेण्यात आले सूत्रसंचालन प्राध्यापक शिरोळे यांनी केले

Google Ad