बिलोली पंचायत समितीच्या आठ गणांचे आरक्षण जाहीर .गजानन प्रकाश पा. वानोळे हे निवडणूकीच्या रिंगणात

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या काल झालेल्या आरक्षण सोडत झाल्याने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा गुलाल उधळण्यासाठी हालचालींचा वेग चालू आहे. तर पंचायत समिती लोहगाव सर्कल मधून नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षण आहे. यासाठी गजानन प्रकाश पा. वानोळे हे गावातील सर्व जाती धर्माच्या लोकांसोबत घनिष्ठ संबंध असून, सोबतच त्यांचा मित्रपरिवार ही मोठा आहे, ते युवा कॉन्ट्रॅक्टर व जय मल्हार सेना बिलोली तालुका उपाध्यक्ष आहेत. व मतदार संघातून त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे असे दिसून येत आहे.आणि ते गेल्या कित्येक वर्षापासून माजी मंत्री तथा माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांच्या सोबत काम केलेले असून आणि माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या सोबत सुद्धा चांगले संबंध व त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहेत, परंतु अद्याप महायुतीच्या नेमकं कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवायची असा संकेत आमच्या प्रतिनिधीशी मिळालेले नाही.