पंडीत जवाहरलाल नेहरू यांचे भारत देश स्वातंत्र्यापूर्वी व स्वातंत्र्यानंतर देशासाठी मोठे योगदान-गुणवंत एच.मिसलवाड
नांदेड – आपला भारत देश ब्रिटीशांच्या जोखडात असतांना 1912 मध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विचारावर प्रभावीत होवून वयाच्या सोळाव्या वर्षी सरळ राजकारणामध्ये उडी घेवून मिठाचा सत्याग्रह, चलेजाव चळवळ, सायमन कमिशन परत जा असे अनेक आंदोलने त्यांनी केले. यासाठीच त्यांना स्वातंत्र्य संग्राम चळवळीत नऊ वेळा जेल झाली. पंडीत जवाहरलाल मोतीलाल नेहरू यांचे भारत देश स्वातंत्र्यासाठी व स्वातंत्र्यानंतर देशासाठी मोठे योगदान होत, असे प्रतिपादन एसटी मेकॅनिक तथा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते मा.श्री.गुणवंत एच.मिसलवाड यांनी केले. ते महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी डेपो) नांदेड आगार येथे दि.14 नोव्हेंबर 2025 शुक्रवार रोजी सकाळी ठिक 10.30 वाजता आधुनिक भारताचे शिल्पकार, भारतरत्न, स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल मोतीलाल नेहरू यांची 136 वी जयंती बालदिन (चिल्ड्रन्स डे) म्हणून मोठ्या हर्षोउल्हासात साजरी करण्यात आली. या अभिवादन कार्यक्रम सोहळ्यात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.
सर्वप्रथम आगाराचे चार्जमन मा.श्री.योगेश्वर जगताप यांच्या हस्ते पंडीत जवाहरलाल मोतीलाल नेहरू यांच्या प्रतिमेचे पुजन करून पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून बोलताना ते पुढे आपल्या भाषणात म्हणाले की, पंडीत जवाहरलाल नेहरू यांनी भारत देश सक्ष्मीकरणासाठी आपल्या 17 वर्षे पंतप्रधान पदाच्या कार्यकाळात नऊ आंतरराष्ट्रीय देशांचा अभ्यास दौरा करून लोकतंत्र मजबूत करणे, देशाची अर्थव्यवस्था, पंचवार्षीक योजना, कृषी, उद्योगात प्रगती, मोठ्या कारखान्यासाठी मदत, 38 कोटी लोकसंख्येच्या काळात 96 टक्के जनता दारिद्रय, गरीब, निरक्षर होती. यांच्या प्रगतीसाठी आपल्या 75 वर्षाच्या आयुष्यामध्ये संवैधानिकरित्या धर्मनिरपेक्ष असे त्यांचे आखरी श्वासापर्यंत देशासाठी महान कार्य होते. म्हणून या आधुनिक काळात युवा पिढीसहीत तुम्ही-आम्ही सर्वच जण पंडीत जवाहरलाल नेहरू यांचे कार्य आणि विचारांचा आदर्श घेवून समाजाप्रती-देशाप्रती कार्य करण्याची हि काळाची गरज आहे, असेही ते शेवटी यावेळी आपल्या भाषणात म्हणाले.
या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून चार्जमन संदीप बोधनकर, योगेश्वर जगताप, एसटी मेकॅनिक तथा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते गुणवंत एच.मिसलवाड, पाळी प्रमुख संजय खेडकर, कैलास वाघमारे, वरिष्ठ लिपीक सुरेश फुलारी, गजानन बाबर, चालक नामदेव डांगे, गजानन जोंधळे, यांत्रीक मंगेश झाडे, संजय मंगनाळे, शिवचरण मळगे यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमास रापम आगारातील कष्टकरी, कामगार-कर्मचारी बंधू-भगिनी बहुसंख्येने उपस्थित होते.
