नियमांना तिलांजली कोट्यावधी रुपयांचा सिमेंट रस्त्याच्या कामाचा दर्जा निकृष्ट … सुनिल चव्हाण

सोयगाव प्रतिनिधी/विजय पगारे
°°°°°°°°°°°°
सोयगाव तालुक्यातील घाणेगाव तांडा बंजारा आदिवासी बहुल गावातून जाणारा मुख्य रस्ता गेल्या जानेवारीत कोट्यावधी रुपये शासनाकडून निधी खर्चून उभारला गेला.सबंधित ठेकेदाराने परिपत्रकातील वर्क आऊट नियमांना तिलांजली देत सिमेंट रस्त्याच्या कामाचा दर्जा निकृष्ट केल्यानं मार्च अखेरपर्यंत रस्त्याच्या सिमेंटची धूळ सर्वदूर उडत असल्याने गावातील नागरिकांची ओरड असल्याने प्रतिष्ठीत ग्रामस्थ सुनिल यशवंतराव चव्हाण यांनी जि.प.बाधकांम विभासह,मंत्रालय मुंबई येथे तक्रारी निवेदन देऊन संबंधीत एजन्सी विरुद्ध कारवाई ची मागणी केली आहे. भारतीय जनता पक्षाची मातृ संस्था राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांनी गोद्रीतांडा ता.जामनेर जि.जळगाव येथे २५ ते ३० जानेवारी दरम्यान पाचशे एकर क्षेत्रावर अखिल भारतीय हिंदू गोरबंजारा व लभाना नायकडा समाज कुंभ चा मोठा कार्यक्रम घेण्यात आला होता.देशभरातून , महाराष्ट्र,गोवा,कर्नाटक, आंध्रप्रदेश तेलंगणा राज्यातील विख्यात संत , महंत , अखिल भारतीय धर्म जागरण विभागासह राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन सुध्दा या वेळी उपस्थित होते, ५० लाखावर जनसमुदायाच्या साक्षिने भव्य दिव्य कार्यक्रम घेण्यात आला, यादरम्यान गोद्रीतांडा जाण्यासाठी सोयगाव तालुक्यातील ढाभा,नांदातांडा,घाणेगाव तांडा सिमेवरूनच प्रवास करून जावें लागनार म्हणून युद्ध पातळीवर रस्त्यांची कामे केली मात्र या दरम्यान अंदाज पत्रकानुसार काम न करता सर्व नियमांना तिलांजली देत केवळ वर वरकरणी खोदून सोलींग न करताच निकृष्ट दर्जाचे सिमेंट चा वापर करून , काम झालेवर रस्त्यावर पाण्याचा वापर न केल्यामुळे सिमेंट ची माती झाल्याने रस्त्यावर वावरत असलेल्या वाहनांमुळे धूळीचा आगडोंब होत आहे. याचा थर परिसरातील घराघरात जाऊन नागरिकांच्या आरोग्याच्या समस्या वाढल्याने ओरड होत असल्याने या प्रकरणाची संबंधित ठेकेदाराला मार्च एंड अंती कामांचे बिल देवू नये , चौकशी करून लोककल्याणकारी रस्त्याचे पून्हा अंदाजपत्रकानुसार दर्जेदार काम करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे. जि.प.बांधकाम विभाग आणि मुंबई मंत्रालयास दिलेल्या तक्रारीत पुढे नमुद आहे की, संबंधित ठेकेदारांच्या एजन्सीचा परववाना रद्द करण्यात यावा अन्यथा लोकशाही मार्गाने तिव्र स्वरूपाचे वेळप्रसंगी आंदोलन छेडण्यात येईल.याची गंभिर दखल घेण्यात यावी असे प्रतिष्ठीत नागरिक सुनिल चव्हाण यांनी वरिष्ठांना दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे.

Google Ad