महामंडळाच्या एस.टी बस मध्ये महिलांना ५० टक्के सवलतीमुळे काळी पिवळी टॅक्सी चालक व मालकावर आली उपासमारीची वेळ

राज्यात लाखो तर सोयगाव तालुक्यात हजारों कुटूंबाची होतेय उपासमार
°°°°°°°

सोयगाव प्रतिनिधी
विजय पगारे
———
राज्य सरकारने महिलांना एसटी बस मध्ये पन्नास टक्के सवलत दिलेली आहे. या निर्णयामुळे महिलनांमध्ये आनंदी वातावरण पाहायला मिळत असले तरीही दुसऱ्या बाजूला काळी पिवळी परमिट टॅक्सी मालकांसमोर मोठे आर्थिक संकटाचे डोंगर उभे राहिले आहे.शासनाच्या या निर्णयामुळे काळी पिवळी परमिट टॅक्सी मालक – खाजगी चालक यांच्यासह ट्रॅव्हल्सच्या व्यवसायाला ताळे लावण्याची वेळ समोर येऊन उभी राहिली आहे. या व्यवसायावर अवलंबून असलेल्या गाडी मालक – चालक व ईतर वाहनचालक एजंट आदींवर उपासमारीची वेळ येऊन ठेपली असून त्यांचे कुटुंबावर उपासमारीच्या खाईत लोटले जात आहेत. राज्यातील लाखो तर एकट्या सोयगाव तालुक्यातील हजारों कुटूंब या निर्णयामुळे प्रभावीत झाले असून मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत.

– नुकताच राज्य सरकारने संपूर्ण महाराष्ट्र राज्यात एसटी प्रवासात महिलांना पन्नास टक्के तिकीट दरात सवलत दिल्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे महिला वर्गात जोरदार स्वागत पण झाले आहे. सोयगाव येथे या निर्णयामुळे काळी पिवळी परमिट टॅक्सी व इतर खाजगी वाहन प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहन चालक व मालकावर आर्थिक दृष्ट्या कंबरडे मोडल्याचे दिसत आहे. काळी पिवळी व इतर खाजगी वाहनांची एक फेरी सुद्धा पूर्ण होत नसल्याने आणि प्रवाशांची वाट बघत संपूर्ण दिवस वाट पाहण्यातच निघून जात आहे. काळी पिवळी परमिट टॅक्सी वाहने तासंतास रिकामी दिसत आहे. सरासरी पुरुषांच्या सोबत महिलाही हमखास असतात महिलांना ५० टक्के प्रवास भाड्यात सूट असल्याने त्यांच्या बरोबर असलेल्या पुरुषांनाही एसटी बस मधून प्रवास करण्याचा निर्णय घ्यावा लागत आहे.
परिणामी दिवसभर काळी – पिवळी परमिट टॅक्सी गाड्या सतत रिकामी दिसल्याने इतर कोणतेही प्रवासी या वाहनात बसत नसून व फेऱ्या कमी होत असल्याने इंधनाचे खर्च पण निघत नसल्याचे काळी पिवळी व इतर चालकांनी सांगितले.काळी पिवळी चालकांना इंधन खर्च, पासिंग खर्च धुवा पावती ,बॅच बिल्ला ,इन्शुरन्स खर्च ,वाहन मॅयलेज, पर्यावरण खर्च वाढत आहे .काही काळी पिवळी वाहन चालकांनी आपली शेती विकून फायन्स कंपनी व बँकेचे कर्ज घेऊन वाहन खरीदी केली तर काही चालकांनी आपल्या घरातील सोने विकून या वाहनांची खरीदी केली आहे. शासनाच्या या निर्णयामुळे मोठ्याप्रमाणात बेरोजगारीचे संकट उभे राहणार असून खाजगी ट्रॅव्हल्स व काळी पिवळी मालक – चालकांची तसेच त्यावर अवलंबून असलेल्या एजंटने शासनाकडे निर्णयाचा पुनर्विचार करण्याची मागणी केली आहे. नसता शासनाने त्यांच्या कुटुंबावर ओढवलेल्या या संकटातून बाहेर काढण्यासाठी पूरक निर्णय घ्यावा त्यांचे परमिट जमा करून त्यांना इतर व्यवसायात सामावून घ्यावे अथवा नोकरी देऊन संकटातून बाहेर काढावे.
———
बाॅक्स

या व्यवसायात असणाऱ्या लाखोंच्या संख्येने काळी – पिवळी परमिट टॅक्सी मालक – चालक तसेच खाजगी ट्रॅव्हल्स कंपनीच्या सदस्यांवर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. सोयगाव शहरासह तालुक्यात सुमारे २५० ते ३०० प्रवासी वाहतूक, काळी पिवळी टॅक्सी असून इतर १०० ते १५० रिक्षा, अप्पे रिक्षा असून परिणामी तीन ते पाच हजार चालक व मालकांच्या कुटुंबीयांना उपासमाराची वेळ आली आहे. या वाहन चालकांना आपली उपजीविका भागवण्यासाठी व आपल्या कुटुंबीयांना पालन पोषण करण्यासाठी दुसऱ्या कामाच्या शोधात बाहेर पडण्याची वेळ आली आहे.

प्रतिक्रिया :
सोयगाव तालुक्यात रोजगार मिळवण्यासाठी एकही औद्योगिक वसाहतीत नाही.१३० कि.मी.चा तालुका असून शेती प्रधान आहे वडोलोप्रजीत दोन एकर शेती आहे.त्यावर कुटुंबांचा उदरनिर्वाह होत असल्याने मागिल वर्षी कापुस विक्री करून त्यात पैशाची आनखी भर करून जुनी दर्जेदार कंडीक्शन ची टॅक्सी घेतली त्यांच्या आधारावर घर संसाराचा गाडा कसाबसा चालायला सुरुवात झाली होती मात्र महीला प्रवाश्यांना ५० टक्के महामंडळाच्या बस मध्ये सवलत मिळाल्याने दिवसभरात एक सुध्दा गाडी भरत नसल्यानें अखेर मिळेल त्या भावात टॅक्सी विकून टाकली.आत्ता हाताला हातमजूरीसाठी वन्य भटकण्याची वेळ आली आहे.

गजानन सोनवणे – सोयगाव
————–

प्रतिक्रिया
काळानुरूप जसे रेडीओ , टेपरीकाॅटर , सायकल , टीव्ही कालबाह्य झालेत अगदी शासनाच्या व एसटी महामंडळाने महीलांना प्रवासात ५० टक्के सवलत दिल्याने यांचा परिणाम सरळ सरळ टॅक्सी प्रवाशी वाहतूक व्यवस्थेवर झला.हा व्यवसाय सुध्दा कालबाह्य होनार शासनाच्या या निर्णयामुळे अनेक बेरोजगार निर्माण झालेत या बेरोजगारांना एक तर रोजगाराची संधी द्यावी अन्यथा मानधनात स्वरूपात महीन्याला १००० दहा हजार बेरोजगार भत्ता द्यावा.

सुनिल पंडीत – चालक सोयगाव

Google Ad