राष्ट्रसंतांनी समाजासाठी चंदनासारखा आपला देह झिजवला_समाज प्रबोधनकार ऋषिकेश महाराज रेळे

Adiwasi kranti Marathi news
भोकर तालुक्यात ग्रामगीता प्रचार रथातून स्वच्छतेचा संदेश
**************”””””””****************************
भोकर (तालुका प्रतिनिधी) आपल्या मुलांना सुसंस्कारित घडवा, शिक्षण द्या, आपले गाव आदर्श बनवा असा संदेश राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेतून दिला, त्यानी आपला देह समाजासाठी चंदनासारखा झिजवला असे विचार राष्ट्रीय समाज प्रबोधनकार तथा गुरुदेव सेवा मंडळाचे प्रचारक ऋषिकेश महाराज रेळे यांनी भोकर तालुक्यात ग्रामगीता प्रचार रथ प्रबोधन यात्रेमध्ये बोलताना दिला.
भोकर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्मारक समिती यांच्या वतीने तालुक्यात ग्रामगीता प्रचार रथ काढून ग्रामस्वच्छतेचा संदेश, व्यसनमुक्ती, युवकांचे प्रबोधन करण्यात आले नागापूर, सोनारी, बेंबर व शिंधी ता.उमरी येथे
समाज प्रबोधन पर कार्यक्रम घेण्यात आले यावेळी बोलताना राष्ट्रीय समाज प्रबोधनकार ऋषिकेश महाराज रेळे म्हणाले बहुजन समाजाच्या हितासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीता लिहिली, पाटोदा गावची ग्रामपंचायत, हिवरे बाजार गाव हे आदर्श बनले ग्रामगीतेच्या संकल्पनेतून आता गावांना युवकांना सुधारणे काळाची गरज आहे कारण व्यसनाधीनता मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे, मोबाईल मध्ये युवक गुंग झाला आहे, मुलींना सुसंस्कार देण्याची सुद्धा गरज आहे, संत गाडगे बाबांनी अंधश्रद्धेवर प्रहार केला आज त्यांच्या अनेक धर्मशाळा मुंबई मध्ये गरीब लोकांसाठी कार्यरत आहेत त्यांनी समाजासाठी महान कार्य केले, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत जनाबाई या संतांना देखील त्रास दिला मात्र त्यांनी समाजासाठी आपले कार्य थांबवले नाही, नागपूर, अमरावती विद्यापीठाला संत गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे नाव देण्यात आले ते महान कर्मयोगी संत होते, आता तरुणांनी व्यसनाधीनता बाजूला सारावी, शिक्षणामध्ये प्राविण्य मिळवावे, ग्रामस्वच्छतेसाठी पुढाकार घ्यावा, जिवंतपणे आई-वडिलांची सेवा करा, तेरविला लाखो रुपये खर्च करतात, लग्न सोहळ्यासाठी लाखो रुपयांचा खर्च होतो साध्या पद्धतीने लग्न करा, आपल्या गरजा कमी करा, अनाठाई खर्च टाळा, शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या पाहिजेत, मुलींनी आपल्या बापाची इज्जत जाईल असे वर्तन करू नये, संपत्ती कितीही कमावली तरी शेवटी तुम्ही केलेले कार्य मागे राहणार आहे म्हणून समाजासाठी कार्य करा छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श जीवनामध्ये घ्या, आदर्शवत जीवन वाघासारखे जगा, आनंदी राहा समाधानी राहा जीवन खूप सुंदर आहे असे ते शेवटी म्हणाले या प्रचार रथ यात्रे मध्ये भोकर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्मारक समितीचे अध्यक्ष बापूराव पाटील सोनारीकर, सहसचिव बी. आर. पांचाळ, संचालक प्रकाश मामा कोंडलवार,व सुभाष दादा वानखेडे, देवराव बोंडलेवाड, गणेश दूमलवाड, हनुमंत बडगर, अवधूत राजुरे दत्ता पाटील, राजू पाटील यांची उपस्थिती होती संगीताची साथ देविदास काळमेघ, अमर ताविडे, मोहन काळे, चंद्रकांत हाडोळे यांनी दिली नागापूर येथे उपसरपंच बालाजी शानमवाड, सिंधी येथे गोविंदराव पाटील सिंधीकर, मारोतराव कवळे व गावातील मान्यवर उपस्थित होते बेंबर येथे उपसरपंच प्र. अंबादास आटपलवाड, सोनारी येथील सर्व ग्रामस्थ मंडळी उपस्थित होते

Google Ad