कार्यालय बिलोलीला आणि कारभार चालतो भोकरहून: परवाना नूतनीकरण साठी अलिखित नियम.

ऊत्पादन शूल्क विभागाचा अजब कारभार#
*************************”””””******”””””
भोकर (प्रतिनिधी)
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कार्यालय बिलोली ला असले तरी कारभार मात्र भोकरला बसून करण्यात येतो आहे मार्च एंड च्या नावाखाली देशी दारू व बिअर बारच्या दुकानांचे परवाना नूतनी करण्याचे काम चालू असून अलिखित नियमा लागू करण्यात आला आहे भोकर मध्ये एका खोलीमध्ये बसून हे काम केल्या जात असल्याची चर्चा ऐकिवात आहे.
काही वर्षांपूर्वी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कार्यालय बिलोली येथे स्थलांतरित करण्यात आले आहे.असे असले तरी “मार्चएन्ड” च्या निमित्ताने भोकरला एका वसाहतीत चक्क बिअरबार,देशी दारू दुकानाचा परवाना नूतनीकरणाचे काम केले जात आहे.अधिकृत लागणारी शासकीय शूल्क आणि “वरकमाई “घेऊन खिसा गरम केला जात आहे.वरिष्ठानी याबाबींकडे त्वरीत लक्ष देऊन संबधीतावर कार्यवाही करावी अशी जनतेची मागणी आहे.
#प्रारंभी शहरातील बिलालनगर वसाहतीत राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कार्यालय कार्यान्वित होते. काहि कारणांस्तव सदरील कार्यालय हे बिलोली शहरात स्थलांतर करण्यात आले.तेव्हा पासुन कार्यालयीन कामकाज हे बिलोली येथे सुरू आहे.शहरात असलेले वाईनशाॅप, बिअर-बार आणि शासनमान्य देशी दारू दुकानदारांना शासकीय कामासाठी बिलोली गाठावी लागत आहे.सदरील विभागानी दुकानादारांना काहि नियमावली लागू केली आहे.नियमाची पायमल्ली झाली तर कठोर कार्यवाही करण्याचा अधिकार त्यांना देण्यात आला आहे.केवळ उदिष्टपूर्ती नाममात्र कार्यवाही करून व्यवसायीकाना रान मोकळे केले जाते. अधूनमधून संबंधित अधिकाऱ्यांचा भोकरला शासकीय दौरा असतो पण मर्जीतल्या दूकानदाराशी “भेट ” घेऊन कसलीच कार्यवाही न करता “खिसा” गरम करुन दौरा आटोपून घेतात.ग्रामीण भागात घरपोच देशीदारूचा पूरवठा केला जातो.शहरात विना परवाना देशी दारूची विक्री सुरू आहे.शासनाने दिलेल्या नियमाचे पालन केले जात नाही.याकडे अधिका-यांचे कमालीचे दुर्लक्ष होत असल्याने व्यापा-याचे मनोबल वाढले आहे.बंदबारीत अव्वाच्यासव्वा दरात दारूची विक्री केली जात आहे.आंबटशौकीन व्यसनाची भूक भागविण्यासाठी अधिक रक्कम देऊन शौकपुरा करीत आहेत.
#शहरात थाटले कार्यालय
“””””””””””””””””””””””””””””””””””””
भोकर शहरात मागील अनेक वर्षांपासून राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कार्यालय कार्यान्वित नाही.एरवी एका खासगी व्यक्ती कडून छोटे-मोठे काम करून घेतली जातात.महिनेवारीचा “आर्थिक” व्यवहार याच व्यक्तीच्या मार्फत केला जात असल्याचे समजते. मार्चएन्ड अवघ्या दोन दिवसांवर आल्याने शासनमान्य दूकानदाराना परवाना नूतनीकरण करणे गरजेचे आहे. त्यासाठी शहरात कार्यालय थाटले आहे. शासन शूल्क सोडून “वरकमाई” केली जात आहे.शासनाच्या डोळ्यात धूळफेक करुन सदरील अधिकारी मनमानी करीत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
आमचे कार्यालय हे बिलोली येथे असून भोकर तालुक्याची जबाबदारी एका निरीक्षकाकडे दिली आहे त्याविषयी तेच माहिती देऊ शकतात अशी माहिती
आनंद चौधरी ,कार्यालयीन अधीक्षक नांदेड यांनी दिलीआमचे बिलोलीत कार्यालय आहे दूकानदाराना चालन भरण्यासाठी सोयीचं व्हावे म्हणून इथे कामकाज सुरू केले आहे. असे.बोडेमवाड,उत्पादन शुल्क निरीक्षक,भोकर यांनी सांगितले

Google Ad