लाल मिरचीचा ठसका सर्वसामान्यांना बसतोय महागाईचा फटका – चटका …

मंगळवारच्या आठवडी बाजारात अंखंड मिर्ची व मिरची पावडर मध्ये झाली भाव वाढ …
>>>>>>>>>>>>>>>>>>
विजय पगारे/सोयगाव प्रतिनिधी
**************
गरिबापासून ते श्रीमंतापर्यंत सर्वसामान्याच्या घरामध्ये रोजच्या जेवणात लाल मिरची आढळून येते. जेवणामध्ये कुठलाही तिखट पदार्थ बनवायचा असेल तर लाल मिरची ची गरज भासतेच. मिरची शिवाय तिखट पदार्थ बनवणे अशक्यच नाही. त्यामुळे लाल मिरची प्रत्येक स्वयंपाक घरातील एक अविभाज्य घटक आहे. उन्हाळ्याची चाहूल लागताच गृहिणी साठवणीचे पदार्थ तयार करण्यासाठी लगबग करताना सर्वत्र दिसून येत आहेत. या साठवणीच्या पदार्थांमध्ये लाल मिरचीची पावडर हा एक महत्त्वाचा तिखट पदार्थ असतो.
जिल्ह्यातसह सोयगाव तालुक्यात सर्वत्र लाल मिरचीच्या दरात मोठी वाढ झाल्याने गृहिणीचे आर्थिक बजेट आणखीन कोलमडली आहे. आधीच मागच्या महण्यामध्ये पन्नास रुपयाने गॅसचे दर वाढल्याने सर्वसामान्य गृहिणी कडून संताप व्यक्त केला जात आहे. महागाईच्या दरवाढीमुळे आधीच सर्वसामान्यांना चटके सोसावे लागत आहेत. त्यातच लाल मिरचीचे दर वाढल्याने गृहिणी मधून नाराजी व्यक्त केली जात आहे.
मागील काही महिन्यापासून वातावरणाचा सततच्या बदलामुळे रब्बीसह इतर पिकावर ही वातावरणाचा परिणाम झालेला आहे. या बदलत्या वातावरणाचा फटका मिरची उत्पादक शेतकऱ्यांना देखील बसलेला आहे. त्यामुळे बाजारात येणाऱ्या लाल मिरचीचे प्रमाण कमी असल्याने मिरचीचे दर वाढल्याचे बोलले जात आहे. या महिन्यात मिरचीच्या दरात क्विंटल मागे तीन ते चार हजार रुपयाची वाढ झाल्यामुळे एक किलो मागे पस्तीस – चाळीस ते पन्नास रुपये वाढले असल्याचे मंगळवारच्या आठवडी बाजारात ग्राहक आणि व्यापाऱ्यांनी सांगितले आहे. या झालेल्या महागाईमुळे सर्वसामान्याचे जगणे मुश्किल झाल्याचे दिसून येत आहे.

चौकट :- आधीच मागच्या महिन्यामध्ये गॅस सिलेंडरच्या दरात पन्नास रुपयांनी वाढ झाली आहे आणि त्यांतच आता लाल मिरची दर वाढत आहेत. त्यामुळे घर चालवणे मुश्किल होत चालले आहे.

सौ.सुनिता पगारे
गृहिणी रमाई कालनी आमखेडा

चौकट:- वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्याचे कंबरडे मोडले जात आहे. दिवसेंदिवस वाढती महागाई ही सर्वसामान्यांसाठी चिंतेची बाब आहे. महागाई जर आटोक्यात आली नाही तर सर्वसामान्यांची जगणे मुश्किल होईल.

सीताबाई मोहिते
गृहिणी सोयगाव
~~~~~~~~~~
बाॅक्स :
आमच्या कडे कंपनीत तयार मिर्ची पावडर असुन भास्कर – २६० , परिसर – २६० , रसगुल्ला – ९०० ते १०० किलो प्रमाणे विक्री केल्या जाते.

निरंजन कुमावत
व्यापारी – शेंदुर्णी
~~~~~~~~~~~
मी व माझे परिवारातील सदस्य परिसरात आठवडी बाजारात जिवनाव्शक घरसंसार उपयोगी दाळ – दाणा खाद्यतेल,साखर आदींसह सुटीमिरची पावडर विक्रीचा व्यवसाय करतो यात तेजा ही फास्ट – २३० , गावरान २६० ,चपाटा – ६०० रुपये प्रती किलो भाव असून किलोमागे चाळीस ते पन्नास रुपये भाववाढ झाली आहे.

हरि रामदास बारी व्यापारी
सोयगाव आठवडी बाजार
~~~~~~~~~~~~~~~
सुशिक्षित बेरोजगार असुन कुटूंबाचा उदरनिर्वाहासाठी स्व:ता घ्या पिक अप ऍपे रिक्षा ने जेथे जेथे आठवडी बाजारात जाणे शक्य होते त्या त्या बाजारात अखंड मिर्ची विक्री करतो आमच्याकडे रेशम पट्टा – ४००,चपाटा – २८०,साधी गावरान – २००,पटना – २५०, रसगुल्ला ८०० रूपये प्रति किलो असा भाव आहे.

कृष्णा चेके
व्यापारी भोकरदन

Google Ad