सोयगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनमोल केदार विजय आहीरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. आणि यावेळी विनोद तेली,सोयगाव तालुका पेन्सनर्स असोशोएशन अध्यक्ष आबासाहेब बावस्कर आदी.

संत श्री आसाराम बापू साधक परिवारातर्फे बसस्थानक सोयगाव समोर शुध्द,थंड ऍक्वागार्ड पाणपोई सुरू…!
~~~~~~~~~~~~~~~~~~~
विजय पगारे
सोयगाव प्रतिनिधी
************
दरवर्षी उन्हाळ्यामध्ये बस स्थानकावर नागरिकांसाठी आणि यात्रेकरू प्रवाश्यांसाठी संत श्री आसाराम बापू साधक परिवारातर्फे अध्यक्ष राजेंद्र आहीरे यांच्या वतीने सोयगाव बसस्थानक समोर मोफत पाणपोई सुरू केली जाते.शुक्रवारी (ता.७) सोयगाव पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरिक्षक अनमोल केदार यांचे हस्ते पाणपोई उद्घाटन करुन मोफत जलवाटपाची सुरुवात करण्यात आली.
सन.२००३ ते २०२३ , गेल्या २० वर्षांपासून शुध्द , थंड ऍक्वागार्ड पाणपोई प्रतिवर्षी उन्हाळ्यात नागरिकांच्या सोयीसाठी ऊपलब्धी आहिरे परिवाराकडून करण्यात येत असते, तालुक्यातील तथा सिमेलगतच्या जिल्ह्यातून सोयगाव बस आगाराच्या बस स्थानकावर बस तासनतास प्रतिक्षा करणाऱ्या आणि खेड्यापाड्यातून येणाऱ्या नागरिकांना शुद्ध , शितल पिण्याच्या पाण्याची मोफतसेवा लाभ होनार आहे , पाणपोई शुक्रवारी सुरू करण्यात आली असून. या शुध्द , थंड ऍक्वागार्ड पिण्याच्या पाण्याचा पुरवठा येत्या जुन महिन्यापर्यंत सुरु राहणार आहे अशी माहिती साधक परिवाराकडून देण्यात आली.
या प्रसंगी सोयगाव नगर पंचायत समिती सदस्य संदीप सुरडकर,सोयगाव तालुका पेन्सनर्स असोशोएशन अध्यक्ष विकास बावस्कर, मच्छिंद्र तेली, योगेश बोखारे , संदिप सोहनी , समाजसेवक, राजकीय पक्ष संघटनेचे पदाधिकारी, विविध दैनिकांचे पत्रकार प्रामुख्याने उपस्थित होते.

Google Ad