महात्मा जोतीराव फुले यांनी शिक्षणात मोठी क्रांती केली म्हणून आज महिलांची उन्नती झाली- गुणवंत मिसलवाड
Adiwasi kranti Marathi news
नांदेड- १८ व्या शतकात इंग्रज लेखक थॉम्स पेन यांनी लिहिलेल्या राईट ऑफ मॅन (मानवी हक्क) या पुस्तक वाचन प्रभावातून म. जोतीबा फुले यांनी प्रस्थापितांना झुगारुन विचाराने पेटून उठले व १ जानेवारी १८४८ ला बुधवारपेठ, मिडेवाडा पुणे येथे पहिली शाळा सथापन करुन ८ मुलींवर सुरवात करुन शिक्षणामध्ये मोठी क्रांती
घडविली म्हणूनच आज भारत देशामध्ये महिलांची उन्नती झाली असे प्रतिपादन एसटी मेकॅनिक तथा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते मा. श्री. गुणवंत एच. मिसलवाड यांनी केले.
ते महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी डेपो) नांदेड आगार येथे दि. ११ एप्रिल २०२३ मंगळवार रोजी सकाळी ठिक १०.३० वाजता क्रांतीसूर्य, शिक्षण महर्षी, बहुजनांचे उद्धारक, थोर समाजसुधारक महात्मा जोतीबाराव गोविंदराव फुले यांची १९६ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.या जयंती
सोहळा कार्यक्रमात ते बोलत होते.प्रमुख वक्ते म्हणून बोलताना ते पुढे आपल्या भाषणात म्हणाले की, म.जोतीराव फुले यांनी मानवाचा एकच धर्म असावा, सत्याने वर्तावा हे ध्येय उराशी बाळगून बालविवाहाला विरोध,स्त्री-पुरुष समानता निर्माण करणे, विधवांचा पुनर्विवाह करणे, जातीभेद नष्ट, चुल आणि मुल प्रथा बंद करणे
असे अनेक कार्य केले. अशा या महान विभूतींचा आपण सर्वांनीच आदर्श घेऊन देशाप्रती कार्य करण्याची काळाची गरज असून या महान समाज सुधारकास केंद्र सरकारने मरणोपरांत भारतरत्न हा पुरस्कार देण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली.सर्वप्रथम आगार व्यवस्थापक मा. श्री. आशिष मेश्राम यांच्या हस्ते म. जोतीराव फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करुन पुष्पमाला अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी चार्जमन विष्णुकांत हारकळ, पाळी प्रमुख
मनोहर माळगे, संभाजी जोगदंड, वाहतुक नियंत्रक बालाजी शिंदे, राजेश धनजकर, वरिष्ठ लिपीक नितीन मांजरमकर, संतोष देवकांबळे, आनंदा कंधारे, श्रीमती आशा वाघमारे, राहुल सोनटके, आकाश जाधव,सातोनकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी आगारातील कामगार कर्मचारी बंधु भगिणी बहुसंख्येने
उपस्थित होते.