कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये भाजपाची मुसंडी

भोकर (अनिल डोईफोडे) कृषी उत्पन्न बाजार समितीचे निवडणूक नुकतीच जाहीर झाल्यामुळे अनेक पक्षाच्यावतीने प्रचारात मुसंडी मारल्याचे दिसून येत आहे अशातच 18 जागेसाठी 194 उमेदवारांनी फॉर्म भरला छाननी मध्ये 16 जणांचे फॉर्म अवैद्य ठरल्याने अंतिम 177 अर्ज वैद्य ठरले गुरुवार वीस तारखेला माघार घेण्याची अंतिम तारीख असल्याने या वीस तारखेला किती उमेदवार अर्ज माघार घेतील याकडे सर्व पक्षांचे लक्ष लागून आहे. अशातच काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना बी आर एस भाजपा इत्यादी पक्षांनी आपापल्या परीने प्रचारात मुसंडी घेतली असे दिसून येत आहे पण या प्रचारात भाजपाचे किशोर पाटील लगळुदकर , दिलीपराव सोनटक्के, मा. जि. प. सदस्य दिवाकर रेड्डी गणेश पाटील कापसे, माऊली पाटील चिंचाळकर,विशाल माने, श्रीकांत किन्हाळकर,चंद्रकांत नागमोड, देशमुखे हे सर्व उमेदवार व कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांच्या विजयासाठी अहोरात्र पायी पीठ करत असल्याचे दिसून येत आहे कृषी उत्पन्न बाजार समिती भोकर मार्केट कमिटीवर भाजपची सत्ता एक हत्ती सत्ता यावी या उद्देशाने दिवस रात्र पक्षाच्या हितासाठी झटत आहेत मतदारा मधून भारत देशाचे विकास पुरुष देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी यांनी ज्या ज्या योजना गोरगरीब व सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी दिलेले आहेत त्या त्या योजनेचे महत्त्व मतदारांना पटवून देऊन मतदारांची मते आपल्याकडे वळवण्याचा प्रभावीपणे प्रयत्न करीत आहेत या सर्व उमेदवार व कार्यकर्त्यांच्या मेहनतीचे फळ नक्कीच भारतीय जनता पार्टीच्या पारड्यात पडेल अशी सर्वसामान्य जनतेमध्ये खमंग चर्चा ऐकवयास मिळत आहे त्याचाच भाग म्हणून कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमाने भारतीय जनता पार्टीचे पारडे जड असल्याचे मतदारांमध्ये एकच चर्चा ऐकव्यास मिळत आहे यावेळेस मात्र कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक रंगतदार होणार अशी चर्चा ऐकण्यात येत आहे, या चर्चेची काँग्रेस पक्षाने चांगलीच

धास्ती घेतल्याचे दिसून येत आहे अंतिम वीस तारखेला किती उमेदवार अर्ज माघारी घेतील याकडे मात्र सर्व पक्षाच्या उमेदवारांचे लक्ष लागून आहे.

Google Ad