राष्ट्रीय स्वतंत्र पत्रकार संघ नवी दिल्ली च्या बुलढाणा जिल्हा अध्यक्ष पदी शिवदास उखर्डा सोनोने यांची निवड

जळगाव जामोद-दिनांक 15 एप्रिल रोजी जळगाव जामोद येथील विश्रामगृहावर राष्ट्रीय स्वतंत्र पत्रकार संघ नवी दिल्ली या संघटनेची तालुका जिल्हा व प्रदेश कार्यकारणी पदाधिकारी यांची एका बैठकीद्वारे नियुक्ती करण्यात आली राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर अब्दुल रहीम, राष्ट्रीय सचिव चंद्रशेखर जायसवार यांचे आदेशाने व महाराष्ट्र अध्यक्ष भीमराव पाटील व महाराष्ट्र कार्याध्यक्ष लिखाकत खान यांचे उपस्थितीत सदर बैठक घेऊन पुढील प्रमाणे नियुक्ती करण्यात आल्या महाराष्ट्र उपाध्यक्ष उत्तमराव वानखडे, महाराष्ट्र सचिव विनोद चिपडे, महाराष्ट्र सहसचिव जिकुउल्लाखान, विदर्भ संघटक जफरखान , बुलढाणा जिल्हाअध्यक्ष शिवदास सोनोने, जळगाव जामोद तालुका अध्यक्ष गोपाल मनोहर अवचार, तालुका उपाध्यक्ष नागेश भटकर, तालुका सचिव श्रीराम भिडे, ह्या नियुकत्या नियुक्ती लेटर देऊन करण्यात आल्या. यावेळी जळगाव जामोद येथील बहुसंख्य पत्रकार बांधव हजर होते.*

Google Ad