चिरनेरमध्ये शेतामधील लोखंडी पोल गेले चोरीला.अज्ञात इसमा विरोधात उरण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल.

पोलिसांचा कसून शोध..लवकरच गुन्हेगार होणार गजाआड उरण दि 28 (विठ्ठल ममताबादे ) उरणमध्ये चोऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. उरण तालुक्यातील दिघाटी रोड, चिरनेर ता. उरण येथे असलेल्या शेतीचे मालक रमेश कृष्णा कडू, वय वर्षे 44, धंदा व्यवसाय यांच्या शेतीत गुरुवार दि 11/5/2023 रोजी रात्री 11 वाजता काही अज्ञात व्यक्तींनी शेतीची नासधूस करून 5 वर्षापूर्वी शेतीच्या संरक्षणासाठी लोखंडी पोलाच्या सहाय्याने कुंपण घातले होते.अज्ञात इसमाने येथील लोखंडी पोलापैकी 30 लोखंडी पोल स्वतःच्या फायदया साठी घेऊन जावून अप्रमाणिकपणे अपहार केला आहे. या चोरीमुळे चिरनेर येथील शेतीचे मालक रमेश कडू यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे रमेश कडू यांनी याबाबत अज्ञात इसमा विरोधात उरण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.11 मे 2023 रोजी गुन्हा दाखल होऊनही अज्ञात आरोपी अजूनही सापडले नसल्याने रमेश कडू यांनी नाराजी व्यक्त केली आहे.सदर अज्ञात आरोपीवर 403 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर इसमास लवकरात लवकर शोधून पोलिस प्रशासनाने त्यांच्यावर कायदेशीर कठोर कारवाई करावी अशी मागणी पोलीस प्रशासनाकडे तक्रारदार रमेश कृष्णा कडू यांनी केली आहे.

अशाप्रकारच्या अनेक चोर्‍या झाल्या असून सदरचा माल आजूबाजूच्या भंगारात विकला जात असल्याचे चिरनेर परिसरातील नागरिकांनी बोलून दाखविले आहे.तर यानिमीत्ताने भंगार दुकानांमध्ये सिसीटिव्ही लावण्याची मागणी देखील पुढे येत आहे. त्या निमित्ताने उरण पोलीस या घटनेची कसून चौकशी करत आहेत. व लवकरच ते गुन्हेगारांपर्यत पोहचतील व ही चोरी उघड होणार आहे.

Google Ad