राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्मारक समिती भोकरच्या वतीने विद्यार्थ्यांचे बालसुसंस्कार शिबिर

Adiwasi kranti Marathi news portal
भोकर (तालुका प्रतिनिधी) राष्ट्रसंत तुकडोजी स्मारक समिती भोकरच्या वतीने भोकर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आश्रमात दि.8 ते 10 जून 2023 दरम्यान विद्यार्थ्यांचे बालसू संस्कार शिबिर घेण्यात आले.
भोकर येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्मारक समिती आश्रमात मागील 4 वर्षापासून सकाळी ध्यान व सायंकाळी सामुदायिक प्रार्थना, जयंती उत्सव, भजन, ग्रामस्वच्छता, ग्रामगीता वाचन, विद्यार्थ्यांना बालसंस्कार आदी कार्यक्रम घेतले जातात, चालू वर्षाच्या उन्हाळी सुट्ट्यांमध्ये विद्यार्थ्यांसाठी 8 ते 10 जून 2023 दरम्यान बाल सुसंस्कार शिबिर घेण्यात आले योग गुरु, आयुर्वेदाचार्य डॉ. विजयकुमार दंडे यांनी सकाळी 7 ते 8 या वेळात विद्यार्थ्यांना सूक्ष्म व्यायाम, ध्यान, योग, प्राणायाम, तसेच सकाळी लवकर उठण्याचे फायदे, आहाराविषयी माहिती, घरात मोठ्यांशी कसे वागावे, कसे बोलावे, अभ्यासात लक्ष लागून राहण्यासाठी काय करावे, निरोगी जीवनशैली कशी असावी अशा विविध विषयावर सखोल मार्गदर्शन केले, 50 मुले व मुलींनी ह्या सुसंस्कार शिबिरात सहभाग घेतला होता.
10 जून रोजी या शिबिराचा समारोप कार्यक्रम घेण्यात आला यावेळी प्रमुख अतिथी म्हणून स्मारक समितीचे अध्यक्ष बापूराव पाटील सोनारीकर, संचालक भगवानराव दंडवे प्रकाशन मामा कोंडलवार, सचिव शामसुंदर पाटील सहसचिव बी.आर.पांचाळ, उपाध्यक्ष बालाजी पाटील कोळगावकर, बसवराज देशमुख, विकास कांडलीकर, गणेशराव दुमलवाड, व्यंकट मारकवार आदींची उपस्थिती होती, प्रारंभी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून मान्यवरांचा सन्मान करण्यात आला प्रास्ताविक बी.आर. पांचाळ यांनी केले भोकर येथे ग्रामगीता प्रचाराचे मराठवाडा स्तरीय केंद्र बनविण्या साठी प्रयत्न सर्वांनी करावेत असे मत मांडले, बापूराव पा. सोनारीकर, भगवानराव दंडवे, प्रकाश मामा कोंडलवार यांनीही आपल्या मनोगतातून या ठिकाणी होणारे बाल संस्कार हे अत्यंत महत्त्वाचे असून विद्यार्थी जीवनामध्ये चांगल्या सवयी लागणे महत्त्वाचे आहे भोकर मध्ये हे अतिशय चांगले काम होत असल्याचे मत व्यक्त केले. योग गुरु डॉ. विजयकुमार दंडे यांनी अतिशय चांगला प्रतिसाद देणाऱ्या पाच विद्यार्थ्यांना वर्षभर योग वर्ग मोफत घेण्याचे सांगून गरीब विद्यार्थ्याना मोफत आरोग्य उपचार देण्यात येईलअसेही त्यांनी सांगितले, आश्रमात योग संस्कार शिबिर घेण्यासाठी आपण वेळ केव्हाही देण्यास तयार आहोत असेआश्वासन त्यांनी यावेळी बोलताना दिले, विद्यार्थ्यांनीही आपले मनोगत व्यक्त करून शिबिर अतिशय चांगले झाल्याचे मत मांडले विद्यार्थ्यांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. मारोती कदम व विद्यार्थ्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

Google Ad