भोकर तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने बसस्थानकात पंख्याची भेट

Adiwasi kranti Marathi news portal
भोकर( तालुका प्रतिनिधी) भोकर तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने भोकर बसस्थानकातील प्रवाशांच्या सेवेसाठी 2 पंख्यांची भेट देण्यात आली.
भोकर येथील बसस्थानकात उन्हाळ्यात प्रवाशांची गैरसोय होत आहे हे लक्षात घेऊन पत्रकार संघाच्या वतीने दोन पंखे भेट देण्यात आली आगार प्रमुख राजकुमार दिवटे यांना सदर पंखे सुपूर्द करण्यात आले यावेळी मराठी पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष एल. ए. हिरे, भोकर तालुका अध्यक्ष बी.आर पांचाळ, सचिव राजेश वाघमारे वृत्तपत्र विक्रेता किशनसिंह चव्हाण, चटलावार व बसस्थानकातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती, अगर प्रमुख राजकुमार दिवटे यांनी यावेळी बसस्थानक हे सर्वांचे आहे स्वच्छता करून बसस्थानकात चांगल्या प्रवाशांना सुविधा देण्यात येतील असे मत व्यक्त केले, बसस्थानकात पंखे बसवण्यासाठी मदत केल्याने मराठी पत्रकार संघाचे त्यानी आभार व्यक्त केले मराठी पत्रकार संघाचे बी. एस. सरोदे, मनोज गीमेकर, शंकर कदम, श्रीकांत देव, सिद्धार्थ जाधव, लतीफ शेख, अनिल डोईफोडे आदींचे या कामी सहकार्य लाभले.