गर्भाशयमुख कर्करोगाच्या प्रतिबंधासाठी एचपीव्ही लसीकरणची ग्रामीण रुग्णालय भोकर येथे सुरुवात

भोकर :- जागतिक महिला दिनापासून गर्भाशयमुख कर्करोगाच्या प्रतिबंधासाठी वय १४ वर्षे पूर्ण झालेल्या परंतु १५ वर्षे पूर्ण न झालेल्या मुलींसाठी नांदेड जिल्ह्यात मा.राहुल कर्डीले साहेब जिल्हाधिकारी नांदेड, मा. मेघना कावली मॅडम मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड, मा. डॉ. रेखा गायकवाड मॅडम उपसंचालक आरोग्य सेवा लातूर, मा. डॉ. संजय पेरके साहेब जिल्हा शल्य चिकित्सक नांदेड, मा. डॉ संगीता देशमुख मॅडम जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद नांदेड, मा. डॉ. राजाभाऊ बुट्टे निवासी वैद्यकीय अधिकारी (बाह्य) यांच्या मार्गदर्शना नुसार व डॉ प्रताप चव्हाण वैद्यकीय अधिक्षक ग्रामीण रुग्णालय भोकर यांच्या नियोजनानुसार ग्रामीण रुग्णालय भोकर येथे एचपीव्ही लसीकरण मोहीम सुरू करण्यात आले आहे.
आज दि. ६ एप्रिल रोजी ग्रामीण रुग्णालय भोकर येथे दोन मुलींना एचपीव्ही लसीकरण करून सुरुवात करण्यात आली.
वय वर्ष १४ ते १५ वर्ष वयोगटातील मुलींना एचपीव्ही लस बाबत माहिती, समज, गैरसमज, सामाजिक माध्यमावरील लसीची चुकीची माहिती आहे. त्या बाबत सविस्तर मार्गदर्शन पालकांना करण्यात आले व त्यांनी आपल्या पाल्याला एचपीव्ही लसीकरण करिता ग्रामीण रुग्णालय भोकर येथे घेऊन आले.
भोकर शहरातील पालकांना कळविण्यात येते की, ज्या मुलींचे वय १४-१५ वर्ष पूर्ण झाले आहे त्यांनी आपल्या मुलींचे एचपीव्ही लसीकरण करण्याकरिता ग्रामीण रुग्णालय येथे घेऊन यावे येताना मुलींचे आधार कार्ड घेऊन यावे असे वैद्यकीय अधिक्षक डॉ प्रताप चव्हाण, आरोग्य निरीक्षक सत्यजीत टिप्रेसवार यांनी सांगितले.
ग्रामीण रुग्णालय भोकर येथील वैद्यकीय अधिकारी डॉ ज्योती यन्नावार, डॉ अपर्णा जोशी, डॉ. अविनाश गुंडाळे, इन्चार्ज सिस्टर उज्वला पवार, आरोग्य सेविका मुक्ता गुट्टे, सरस्वती दिवटे, संगीता पंदीलवाड, आरोग्य कर्मचारी नामदेव कंधारे,योगेश पवार, संजय धुमाळे, मारोती गेंदेवाड आदी उपस्थित होते.